पुरंदर तालुक्यातील आडाची वाडी येथे घराच्या अंगणामध्ये बिबट्या शिरल्याने भीतीचे वातावरण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आडाचीवाडी ता. पुरंदर येथे मध्यरात्री बिबट्या घराच्या अंगणामध्ये शिरल्याने, परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. %?अरविंद जंगल पवार यांच्या घराबाहेर आलेल्या बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला मात्र, आपल्या सहा पिल्लांच्या बचावासाठी त्या कुत्र्याने दिलेल्या प्रती हल्ल्यामुळे थरारक झटापट झाली, शेवटी बिबट्याने पिल्लांना सोडून, पाळीव कुत्र्याला घेऊन, पोबारा केला. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारामध्ये कुत्र्याचे जोरात भुंकण्याचे आवाज ऐकून, पवार यांनी मुलगा ओंकार सह घराबाहेर धाव घेतली, तेव्हा अंगणात बिबट्या आणि कुत्रा यांच्यात झटापट सुरू असल्याचे, त्यांनी पाहिले पवार कुटुंबीयांच्या आरडाओरडी नंतर बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लांना जागेवर सोडले आणि पाळीव कुत्र्याला ओढत घेऊन, निघून गेला अशी माहिती ओंकार पवार यांनी दिली. आडाचीवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी वन विभागाने तात्काळ उपायोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. यावर पुरंदर तालुक्यातील वन विभागाने वेळीच उपायोजना कराव्यात अन्यथा वन विभागाला पुढच्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल अशी पुरंदर तालुक्यातून सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे .विशेषता काळदरी खोऱ्यामधील बहिरवाडी, पिसाळवाडी या क्षेत्रामध्ये बिबट्याने भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेले असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित त्या ठिकाणी नुकसान भरपाई साठी पंचनामे करावेत व त्या ठिकाणी काही ठिकाणी क्षेत्रांमध्ये जाळी वगैरे लावण्याची जर इच्छा असेल तर वन विभागाने त्वरित त्या ठिकाणी पिसाळवाडी येथे जाळीचे कुंपण त्वरित बसून द्यावे, अशी मागणी पिसाळवाडी येथील अण्णा (महाराज) पिसाळ यांनी केलेली असून, त्यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments