पुरंदर तालुक्यातील नगरपरिषद निवडणूक ही जोरदार तयारी;तर आचारसंहितेमुळे सासवड फ्लेक्स मुक्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने, थेट सकारात्मक परिणाम शहराच्या सौंदर्यावर दिसू लागलेला आहे. विदीर्णाकरणाला कारणीभूत ठरलेल्या अनाधिकृत फ्लेक्स आणि जाहिरात फलकावर पालिकेने कारवाईचा बडगा उभारलेला आहे. पालिका इमारती समोरील तसेच, मुख्य रस्ते चौक आणि पथदिव्यांच्या खांबावरील सर्व फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्स हटवण्यात सुरुवात झालेली असून, शहर आणि आता फ्लेक्स मुक्त श्वास घेतलेला आहे, गेली काही महिन्यापासून राजकीय शुभेच्छा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आणि व्यावसायिक जाहिरातींनी शहरातील मुख्य ठिकाणासह पथदिव्यांचे खांब पूर्णपणे व्यापलेले होते, यामुळे सासवडच्या सौंदर्याला बाधा पोहोचत होती, सहा महिन्यापूर्वी मोहीम राबूनही परिस्थिती पुन्हा "जैसे थे" झालेली होती, मात्र नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होऊन, आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्याधिकारी डॉ. कैला स चव्हाण यांनी या गंभीर समस्येवर कठोर पाहूल उचलण्याचे बळ मिळवले आहे. आचारसंहिता लागू होताच, पालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्व अनाधिकृत फ्लेक्स हटवण्याची मोहीम सुरू केली, उमेदवार, कार्यकर्ते, नागरिकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, यापुढे अनाधिकृतपणे फ्लेक्स लावणाऱ्या वर कठोर कारवाई केली जाईल. डॉ. कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपालिका.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments