Hot Posts

6/recent/ticker-posts

काळदरी खोऱ्यात रानडुकरांचा हैदोस शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान हातातोंडाशी आलेले भात पीक मातीमोल, पंचनामे करण्याची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना गेली वर्षभर विविध नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाने हाहाकार केला थोडी वसंत घेतली की मोसमी पावसाने ही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे पावसाळा संपून हिवाळा चालू झाला तरीही अवकाळी पाऊस ठीक ठिकाणी पडत असल्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यातच वन्यप्राण्यांनीही शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेला घास नासदूस करून शेतकऱ्यांचा जीव मेटाकोटीला आणला आहे. काळदरी खोऱ्यातील बांदलवाडी, बहिरवाडी, काळदरी, दवणेवाडी, धनकवडी, मांढर तसेच घेरा पुरंदर, देवडी, केतकावळे व चिवेवाडी, पानवडी या गावांच्या परिसरामध्ये रानडुकरांनी आणि मोरांनी अक्षरशा हैदोस घातला आहे. रानडुकरांचे कळप मोरांचे थवेच्या थवे या परिसरातील भुईमूग व भात पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या परिसरातील जवळजवळ 500 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र नुकसानग्रस्त झाले असून शेतकऱ्याचे प्रत्येक कंबरडे मोडले आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वनविभाग महसूल व कृषी विभागाला लेखी पत्राद्वारे आपली कैफियत मांडली आहे. व ताबडतोब प्रशासनाने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे करावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई द्यावी असे अनेक शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. पंचनामे करण्यास उशीर केल्यास नुकसानग्रस्त भागातील भात व 20 ट्रक काडाचे गोळा करून पुरंदर तहसील कार्यालयासमोर टाकण्याचा काही शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.कोट: काढनीला आलेल्या भात पिकावरती अवकाळी पावसाने तडाका दिल्यानंतर उरला सुरल भात पीकही रानडुकरांनी उध्वस्त केल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी वर्षभर आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा. कारण या भात पिकावरतीच या परिसरातील बरेच शेतकरी अवलंबून आहेत. यंदा चांगला पाऊस पडला होता त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे मिळण्याची अपेक्षा होती परंतु अवकाळी पावसाने झोपवल्यानंतर रानडुकराने आणि मोरांच्या थव्याने उरलेस उरले पीकही संपवून टाकले आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी असे चिवेवाडी येथील शेतकरी ईश्वर दरेकर व बहिरवाडी येथील शेतकरी प्रवीण भगत यांनी यावेळी सांगितले आहे. चौकट: नुकसानग्रस्त काळदरी आणि पानवडी परिसरातील शेतकऱ्यांनी लेखी अथवा ऑनलाईन अर्ज भरल्यास त्यांच्या पिकांचे पंचनामे केली जातील तसेच काही अडचण असल्यास त्यांनी वनविभागाशी संपर्क साधावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही केली जाईल असे सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments