पुरंदर तालुक्यातील सासवडची स्वच्छ शहर असलेली प्रतिमा ढासळलेली; तर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे शहरातील मूलभूत प्रकल्प "जसेच्या तसे" सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक.मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: देशात "स्वच्छ सुंदर शहर स्पर्धेत गौरव" मिळवणाऱ्या सासवड नगरपालिकेची आत्ताची अवस्था पूर्णपणे सामान्य नागरिकांसाठी चिंताजनक बनलेली आहे. नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल तीन वर्षापेक्षा जास्त होऊन, प्रशासकीय कारभार पूर्णतप्प ठंप झालेला आहे, अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानीमुळे शहरातील मूलभूत प्रकल्प रखडले असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस असे पाऊल उचलले जात नाही, अशी सामान्य नागरिकांची तीव्र स्वरूपात नाराजी आहे. सध्या तरी शहरातील आरोग्य ,बांधकाम आणि पाणीपुरवठा यासारख्या महत्त्वाच्या विभागांना असा जबाबदार अधिकारी नसल्याने, नागरी समस्यांचा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत, त्रिशूल सोसायटीत रस्त्याचे काम सुरू असतानाही, संबंधित ठिकाणी कोणतीही देखरेख नसल्याने, ठेकेदार यांच्या मनमानीमुळे काम करत असून, सिमेंट रस्त्याच्या कामादरम्यान, पाणी व ड्रेनेज लाईन फुटल्याने, अनेक प्रकार विविध ठिकाणी म्हणजेच तारादत्त पश्चिम मध्ये सुद्धा ड्रेनेज सहा ते सात महिने फुटले असून, त्याचा त्रास बेकरी, कॅफे हाऊस अशा नव्हे ते दहा दुकानदारांना दुर्गंधीला, आरोग्याला हानिकारक असून, तक्रार सासवड नगरपालिकेत देऊन, सुद्धा कोणतीही ठोस भूमिका होत नाही, मग दुकाने बंद ठेवायची का? व्यवसाय करायचा का नाही? याची उत्तर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी द्यावे, यासाठी आता दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, या दरम्यान शहरातील पाणीपुरवठा योजना या कालबाह्य झाल्याने, नवीन योजना मंजूर असतानाही त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही आत्तापर्यंत झालेली नाही, कचरा रस्त्यावर, कचरा संकलन व व्यवस्थापन यंत्रणा ही पूर्णपणे विस्कळीत झाली असून, अनेक घंटागाड्या बंद अवस्थेत आहेत .त्याचा त्रास सामान्य नागरिकांना का? त्यामुळेच नागरिक त्रस्त होऊन, कचरा हा रस्त्यावर टाकत आहेत, भुयारी, वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाले असले तरी, जोडणी आणि आवश्यक निधीकरण पाठपुरावा न झाल्यामुळे प्रकल्प अडकून राहिलेले आहेत, यामुळे नगर परिषदेची निष्क्रिय व उदासीनतेमुळे शहरातील विकास कामे ठप्प आहेत, नागरिकांच्या मूलभूत गरजा अपुऱ्या राहिल्या आहेत. गौरवशाली सासवडचा दर्जा जर टिकवण्यासाठी तातडीने प्रभावी पावले उचलण्याची सध्यातरी गरज सासवड नगरपालिकेला आहे, असे मत सामान्य नागरिक करीत आहेत,तर आता निवडणूक आल्यामुळे उमेदवार काय आश्वासन देण्यात येणार हे पहावे लागेल असे सामान्य नागरिकांनी मत मांडलेआहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments