Hot Posts

6/recent/ticker-posts

मागणी मान्य झाल्यामुळेच आंदोलन मागे;तर सासवड मध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेने पुकारलेले धरणे आंदोलन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तहसील कचेरी समोरील जनहिताच्या मागण्यासाठी सोमवारपासून दि. 3 पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य युवक अध्यक्ष मनोज भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून, गुरुवारी दि. 6 रोजी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी आंदोलकाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे, व आचारसंहिता असल्यामुळे, आंदोलकांनी हे बेमुदत आंदोलन मागे घेतले आहे. प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या न्यायालयात जे खटले चालू आहेत, त्याचा निकाल राखून न ठेवता, तातडीने देण्यात यावा, आणि राखून ठेवलेला निकाल कशासाठी राखून ठेवला आहे, याची खातेनिहाय चौकशी व्हावी, अनुसूचित जाती जमातीचे दाखले तात्काळ देण्यात यावेत, यापूर्वी मंडल अधिकारी पंचनामे करून दाखले तातडीने देत होते, ती प्रक्रिया पुरवॅत करावी, शासनाच्या वतीने सेतू कार्यालय अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा बाहेर खाजगी कार्यालयात सुरू आहेत, त्यामुळे जनतेची आर्थिक लूट होत आहे, तरी खाजगी कार्यालय तात्काळ बंद करावीत, भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्र, सरकारी यंत्रणे मार्फत मोजणी करण्यात यावी, लहान क्षेत्र आहेत म्हणून मोजणी नाकारली जाऊ नये, मोजणी केल्यानंतर खात्यामार्फत नकला देण्यासाठी पैसे घेतले जातात, पण त्याची पावती मिळत नाही, या मध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी दुय्यम निबंध कार्यालयामध्ये जे चुकीचे दस्त होत आहेत, त्याची खातेनिहाय तातडीने चौकशी करावी, महावितरण नि जे नवीन मीटर बसवायला सुरुवात केली आहे, त्या मीटरची फिरण्याची गती जास्त असल्याने, ग्राहकांना विज बिल दुप्पट येत आहेत, तरी हे नवीन मीटर बसवणे तातडीने थांबवावे, जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून, पोलीस ठाण्याचे अधिकारी लक्षपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, त्यांना तातडीने निलंबित करून, अवैध धंदे बंद करावेत, आधी जनहिताच्या मागण्यासाठी 3 नोव्हेंबर पासून सासवड नवीन तहसील कचेरी येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते, पण गुरुवारी दि. 6 रोजी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी आंदोलकांना बोलवून त्यांच्या मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे व आचारसंहिता असल्यामुळे, आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आहे, यावेळी पुणे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळ भिसे ,पंढरीनाथ आढागळे, भानुदास भिसे, किशोर आढागळे, संदीप भोंडे, चंद्रकांत भिसे, सचिन भोंडे, बाळासो शेंडकर, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments