Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जयंत तयारी सुरू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली असून, 'क' वर्ग असणाऱ्या या नगर परिषदेमध्ये यांचा जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जाणारा असून, 11 प्रभागांमधून एकूण 22 नगरसेवक निवडले जाणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करमणूक शाखा पुणे येथील तहसीलदार सतीश थिटे यांची नेमणूक केलेली आहे. सासवड नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण 33,656 मतदार असून, यासाठी 36 मतदान केंद्रे सज्ज झालेली आहेत, मतपेट्यांचा सुरक्षा कक्ष आणि मतमोजणी नगरपरिषद कार्यालयेतच होणार आहे, सर्व राजकीय पक्ष ,उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून, निवडणूक शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केलेले आहे .निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर म्हणजेच 26 नोव्हेंबर नंतर उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ पाच दिवसाचा अवधी मिळणार आहे, यामुळे सर्वच राजकीय पक्ष उमेदवार व कार्यकर्त्यांची धांदल उडालेली असून, अद्याप एकही पॅनलने नगराध्यक्ष, तसेच सदस्याची उमेदवारी जाहीर केली नाही, नगराध्यक्ष पद सर्वसाधारण साठी असल्याने, मोठी चूरस सासवड नगरपालिकेत पाहायला मिळणार आहे, ज्या मतदारांची नावे दुबार असतील, अशांनी त्यांना कोणत्या प्रभागात मतदान करायचे आहे, याबाबत दोन दिवसात पालिकेत लेखी अर्ज द्यावा, अन्यथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय ग्राह्य धरला जाईल. डॉ. कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपालिका.

Post a Comment

0 Comments