Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील बांदलवाडी शाळेत शिक्षका नसल्याने शिक्षण थांबवले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: काळदरी ता. पुरंदर केंद्रातील बांदलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 14 ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये शिक्षिका अनुपस्थित राहिल्याने, शिक्षण पूर्णपणे ठप्प झालेले असून, डोंगराळ व दुर्गम भागातील फक्त तीन विद्यार्थ्यांची ही शाळा शिक्षक अशी वाईट चालत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी जून 2024 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या एक असल्यामुळे, शिक्षिका रेणुका शेडकर यांची तोंडी बदली बोपगाव शाळेत करण्यात आली होती. मात्र यंदा विद्यार्थ्यांची संख्या तीन आहे, परंतु रवींद्र गावडे यांच्या 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या ऑनलाईन बदली नंतर पुरंदरच्या शिक्षण विभागाकडून शेडकर यांना बांदलवाडीत रुजू होण्याचे आदेश दिले गेले नाहीत दरम्यान, शाळेत केवळ स्वयंपाकी महिला उपस्थित होऊन, मध्यान भोजनाची तयारी करत होत्या, तर मुले शिक्षणाऐवजी खेळण्यात वेळ घालवत होती. ग्रामस्थ म्हणतात शिक्षक येत नाहीत, मुलं रिकामी बसतात शिक्षण विभागाला वारंवार सांगूनही, काहीच हालचाली नाहीत, गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांनी सांगितले रेणुका शेडकर या 14ऑक्टोबर पासून बांदलवाडी येथून बोपगाव शाळेत तत्कालीन गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तोंडी बदली केली होती रवींद्र गावडे यांच्या बदली नंतर शेंडकर पुन्हा रुजू झाल्या आहेत मात्र रेणुका शेंडकर या 14 ऑक्टोंबर पासून ३ नोव्हेंबर पर्यंत गैरहजर होत्या, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झालेले आहे, त्यामुळे ग्रामीण शाळा कडे अशा निष्काळजीपणामुळे, शिक्षण विभागाचे दुर्लक्षच उघड झालेले दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments