पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वंदे मातरम गीताने गौरवशाली इतिहास पूर्ण केलेला असून, या अवसराचा उपयोग करत असताना, सासवड येथील पुरंदर शैक्षणिक सकुल येथे विविध शाळा व महाविद्यालयामधील सुमारे चार ते पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम गीत सादर करून, मातृभूमीला अभिवादन केले. कार्यक्रमात शासकीय आयटीआय मधील विद्यार्थ्यांची नाटिका, सुवर्ण होले यांनी सुरेल गायन सादर केले. कार्यक्रमात दीप प्रज्वलन, शासकीय आयटीआय मधील तसेच राधे बाह्य गव्हाणकर यांचे वंदे मातरम विषयक मनोगत देखील झाले. चार ते पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती, सध्या तरी निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे, त्याचे पालन करत हा कार्यक्रम तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पोलीस निरीक्षक कुमार कदम, प्राचार्य पंडित शेळके, प्राचार्य राजश्री चव्हाण, प्राचार्य संगीता काळभोर, प्राचार्य इस्माईल सय्यद, प्राचार्य पूजा जोग, शिवहार लहाने, संतोष जगताप, प्रमोद धनावडे, अनिल सौंदाडे, वैभव डुबल, हरिभक्त गोपाळ काळे, दिलीप गिरमे ,अरुण आप्पा जगताप, दीपक जांभळे, उमेद अभियानाच्या व्यवस्थापक नंदा कोरडे ग्राम संघाच्या सुनीता भादेकर या सर्व शाळांचे शिक्षक, पालक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवे येथील क्रांतिवीर उमाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व समन्वयक प्राचार्य राजेश धानोरकर यांनी सर्वांचे आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments