Hot Posts

6/recent/ticker-posts

दिलीपआबांनी उभा केलेला वटवृक्ष भविष्यात कल्पवृक्ष बनवणार - आमदार विजय शिवतारे सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची आपातकालीन बैठक आज पार पडली. संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार आमदार विजय शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी संस्थेचे सरव्यवस्थापक योगेश महांगरे, संस्थेचे उपाध्यक्ष मुरलीधर यादव, संचालक कृष्णा मोरे, बबनराव यादव, माजी सरव्यवस्थापक धर्माजी यादव, रोहिदास अहिरे, उत्तम यादव , सुदाम कुंभार, ज्ञानेश्वर यादव, पोपट गायकवाड, बाळासाहेब राऊत, विलास वाघोले, रविंद्र यादव, दत्तात्रय यादव, हिराबाई काळभोर, मालती यादव, व्यवस्थापक मनोहर धुमाळ व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपआबा यादव यांचे नुकतेच निधन झाले. संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत दिवंगत दिलीप आबा यादव यांना श्रद्धांजली वाहून बैठकीला सुरवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना आमदार शिवतारे म्हणाले, १९९३ साली आबांनी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. संस्थेच्या एकूण ११ शाखा राज्यभर कार्यरत आहेत. आगामी कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच संचालक मंडळ ही संस्था अधिक समृद्ध करण्यासाठी कसोशीने कार्यरत राहतील असा विश्वास यावेळी शिवतारे यांनी व्यक्त केला. संस्थेच्या कामकाजावर यापुढे मी स्वतः बारकाईने लक्ष ठेवेल. सर्व सभासद, ठेवीदार आणि खातेदारांना अधिक सक्षमपणे आणि विश्वासार्ह सेवा दिली जाईल असे प्रतिपादन करीत शिवतारे म्हणाले आबांनी उभा केलेला हा वटवृक्ष भविष्यात कल्पवृक्ष बनेल. यासाठी आपण सर्वजण नेटाने कार्य करू. यावेळी सरव्यवस्थापक योगेश महांगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापक मनोहर धुमाळ यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments