मराठी बाणा महाराष्ट्र ही मराठी भाषिकांची पवित्र भूमी आहे मराठी भाषेमुळेच सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्राची घडण झाली. बहुसंख्य मराठी भाषिकांच्या ठाम भूमिकेमुळेच मुंबई महाराष्ट्रात सामील झाली आणि म्हणूनच मुंबई हा मराठी माणसाचा मानबिंदू आहे. राज्यातील प्रत्येक राजकीय पक्ष व प्रत्येक नेता मराठीचा आग्रह धरताना दिसतो. मात्र हा आग्रह केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतूनही प्रतिबिंबित होणे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. आज राज्यातील मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. हिंदीसह त्रिभाषा धोरणाचाअवलंब होऊ पाहत आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहेआणि येथे राहणाराप्रत्येक जण मराठी भाषिक आहे, असे गृहीत धरणे स्वाभाविक आहे. मराठी भाषेला सुमारे दोन हजार वर्षांचा समृद्ध इतिहास असून तिला अभिजात भाषेचा मान लाभलेला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना मराठीचेआकलन असणे ही नियुक्तीची अत्यावश्यक पूर्वअट असली पाहिजे. याच धर्तीवर महानगरपालिका निवडणुकांसाठी निवडणूक लढवणारा नगरसेवक हा मराठी भाषिक असावा, अशी स्पष्ट अट असावी, ही काळाची गरज आहे. या विषयावर सातारा येथेहोणाऱ्या नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठराव मांडून तो संमत करण्यात यावा,असे आवाहन व सूचना आहे. अशी माहितीदिलीप केशवराव निरगुडे सासवड अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्यपरिषद, शाखा सासवड यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments