Hot Posts

6/recent/ticker-posts

सावित्रींचा महिमा !महाक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव खानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे खानवडी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.भव्य-दिव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या जयंती सोहळ्यानिमित्त भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, तसेच निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी, पुणे जि.प चे कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, संचिता कुंभार उपस्थित राहणार असून, पद्मश्री शितल महाजन , प्रतिमा जोशी, सुरेखा यादव, आय. पी. एस शारदा राऊत, डॉ. शबनम शेख आदिंना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे . महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मभूमीमुळे पुरंदर तालुका पावन झाला असून, सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रात तालुक्याचा लौकिक वाढलेला आहे. याच पार्श्वभूमीवर ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती खानवडी येथे भव्यतेने साजरी करण्याच्या दृष्टीने गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सासवड येथील तुकाई मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली.या बैठकीत नवनाथ होले, यांनी प्रास्ताविकात जयंती उत्सवाचा सविस्तर आढावा घेत खानवडी येथे सुरू असलेल्या तयारीचा व विविध उपक्रमांचा वृत्तांत सभेपुढे मांडला. कार्यक्रम अधिक प्रभावी, वैचारिक व लोकप्रबोधनात्मक व्हावा यासाठी उपस्थित मान्यवरांनी आपापली मते व सूचना मांडल्या.या बैठकीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सासवडचे अध्यक्ष ॲड दिलीप निरगुडे, ज्येष्ठ पत्रकार नाना भोंगळे , वामनराव भोंगळे , अरविंद म्हेत्रे, ॲड बापू गायकवाड , गौरव चौखंडे यांचे सह विविध सामाजिक संस्था, शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा जागर, स्त्री-शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक समतेचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments