Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:


पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने घेतलेल्या क्रीडामहोत्सवात जिल्ह्याच्या विविध शाळांतील सुमारे चार हजार विद्यार्थी खेळाडूंनी जीगरबाज खेळी करीत उपस्थितांची मने जिंकली. दोन दिवस झालेल्या स्पर्धांमुळे सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाच्या क्रीडापंढरीचे स्वरूप आले होते. संस्थेतील विविध विद्यालयांच्या वाघोली, खानापूर, आकुर्डी, ओझर, पौड, निमगाव केतकी, सुपे, नसरापूर, न्हावरे असे नऊ गटात कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, या सांघिकसह अॅथलेटिक्सच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये संस्थेच्या सर्व शाखांमधील सुमारे 15 हजार खेळाडू सहभागी झाले होते. गटस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळले. सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर दोन दिवस सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांचा थरार पहायला मिळाला. अनेक खेळाडूंची चमकदार खेळी, डाव टाकण्याच्या पद्धती, सांघिक एकात्मतेची उपस्थितांनी वाहवा केली. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अड.संदीप कदम, खजिनदार अड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रजिस्ट्रार सिताराम अभंग, अधिक्षक किरण देशपांडे, विशेष कार्यकारी अधिकारी प्रमोद जाधव, अकाऊटंट गोरख सोंडकर, क्रिडा विभागाचे समन्वयक डॉ.योगेश पवार, क्रीडा अधिकारी शाम भोसले, संतोष पठारे, आदिनाथ पाठक, सासवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडीत शेळके, शेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या राजश्री चव्हाण तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक तसेच वाघीरे महाविद्यालय आणि फार्मसी महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि सेवक यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. विविध स्पर्धातील विजेत्या, उपविजेत्या मुले आणि मुलींची गटनिहाय नावे पुढीलप्रमाणे (कंसात शाळेचे नाव) – 14 वर्षे वयोगट – 100 मीटर धावणे – मुले – राहूल वाघमारे (पानशेत), प्रणव भोसले (ओझर), मुली – आर्या बालघरे (शिंद), आराध्या थोरवे (शिरोली बुद्रूक), 200 मीटर धावणे – मुले – प्रणव भोसले (ओझर), विशाल बढे (मुंढवा), मुली – शर्वरी थोरवे (शिरोली), आर्या बालघरे (शिंद), 400 मीटर धावणे – मुले – राहूल वाघमारे (पानशेत), विशाल बढे (मुंढवा), मुली – शुंभागी राठोड (वडगावशेरी), प्रगती कवडे (खराडी), 600 मीटर धावणे – मुले – हरीओम कश्यप (मुठा), सोमनाथ बर्डे (शिरोली), मुली – एकता डोळस (येणेरे), धनश्री पवार (मांडकी), लांब ऊडी – मुले- प्रेम शिळीमकर (वेल्हे), राहूल वाघमारे (पानशेत), मुली – श्रेया जगताप (सूपे), श्रेया विभाड (मावडी), 4 बाय 100 मीटर रिले – मुले – घोटवडे, ओझर, मुली – उरळगाव, शिरोली, कबड्डी – मुले – वडगाव शेरी, वेल्हा, मुली – वडगाव शेरी, शिवणे. व्हॉलीबॉल – मुले – चऱ्होली, ओझर, मुली – ओझर, चऱ्होली, खो खो – मुले – निमगाव केतकी, शिंद, मुली – संविदणे, मावडीकडेपठार, बुद्धीबळ – मुले – हर्षद वाघमारे (देहूरोड), प्रतिक पाटील (खराडी), मुली – आर्या कोल्हे, कृतिका खैरनार (खराडी). योगासने – मुले- श्रेयस तरटे, अर्णव जाधव, मुली – दिव्या रूपनेर, निर्धा धुरी. 17 वर्षे वयोगट – 100 मीटर धावणे – मुले – मोनू यादव (वडगाव शेरी), प्रत्यय देशमुख (आकुर्डी), मुली – ओवी भोयणे (पौड), ऋतुजा महानवर (सूपे), 200 मीटर धावणे – मुले – प्रत्यय देशमुख (आकुर्डी), यादव (वडगाव शेरी), मुली – पूर्वा कोळेकर (संविदणे), चैत्राली लोंढे (डाळज), 400 मीटर धावणे – मुले – नितेश यादव (येणेरे), ऋतिक पाचकळे (नसरापूर), मुली – समृद्धी केदारी (बोरी), आकांक्षा खंडागळे (न्हावरे), 800 मीटर धावणे – मुले – चिराग हांडे (ओतुर), धनाजी कोकरे (सूपे), मुली – वृषाली मधे (येणेरे), ओवी भोयणे (पौड), 1500 मीटर धावणे – मुले – चिराग हांडे (ओतुर), संतोष पवार (मुंढवा), मुली – वृषाली मधे (येणेरे), शिवानी भालेकर (येणेरे), लांब ऊ़डी – मुले – हन्नाम जुबेर (नसरापूर), मोहीत भामे (सूपे), मुली – आकांक्षा खंडागळे (न्हावरे), रोशनी बरडे (मुंढवा), गोळा फेक – मुले – दिपेश साळुंके (डाळज), दत्ता बराकडे ( मांडकी), मुली – लावण्या लंघे (न्हावरे), गायत्री मोरे (ओझर), 4 बाय 100 मीटर रिले – मुले – आकुर्डी, न्हावरे, मुली – न्हावरे, निमगाव केतकी, कबड्डी – मुले – शिवणे, सासवड, मुली – संविदणे, आकुर्डी. व्हॉलीबॉल – मुले – ओझर, चऱ्होली, मुली – ओझर, चऱ्होली, खो खो – मुले – सुपे, निमगाव केतकी, मुली – निमगाव केतकी, शिंद. बुद्धिबळ – मुले – रणजित वाघमारे (शिवणे), अथांग हळगुंडे (खराडी), मुली – देवयानी अहिरे , सिद्धी ओव्हाळ (पिरंगुट). योगासने – ओम साठे, स्वराज सुतार, मुली – वैभवी श्रीमंदीलकर, सिद्धी गोमसाळे 19 वर्षे वयोगट – 100 मीटर धावणे – मुले – अमेय केदारी (आकुर्डी), करणे खवले (सासवड), मुली – वंशिका बंगाळे (आकुर्डी), सुप्रिया दिघे (न्हावरे). 200 मीटर धावणे – मुले – संतोष साठे (चऱ्होली), राजवर्धन वाघमारे (पौड रोड). मुली – प्रिया गुंड (नानगाव), वंशिका बंगाळे (आकुर्डी), 400 मीटर धावणे – मुले – राजवर्धन वाघमारे (पौड रोड), किशोर गोडे (ओतुर), 800 मीटर धावणे – मुले – किशोर गोडे (ओतुर), शुभम जगताप (सूपे), मुली – पायल तांबे (न्हावरे), आदिती भालेकर (येणेरे), 1500 मीटर धावणे – मुले – किशोर गोडे (ओतुर), शंभो गायकवाड (ओतुर), मुली – आदिती भालेकर (येणेरे), विनिता पटेल (वडगावशेरी), लांब ऊ़डी –मुले – शंभो गव्हाणे (न्हावरे), शंतनू वाढेकर (सासवड), मुली – श्रावणी खारतोडे (कळस), विनीता पटेल (वडगावशेरी), गोळा फेक – मुले – संग्राम कुतवळ (सूपे), अमन शेख (वाघोली), मुली – साक्षी शेंडगे (न्हावरे), सोनल नगरे (डाळज), थाळी फेक – मुले – गौरव नाणेकर (कामशेत), अमन शेख (वाघोली), मुली – भाग्यश्री खारतोडे (कळस), सृष्टी नगरे (डाळज), 4 बाय 100 मीटर रिले – मुले – ओतुर, सुपे, मुली – डाळज, आकुर्डी, कबड्डी – मुले – न्हावरे, वडगावशेरी, मुली – वडगावशेरी, न्हावरे, व्हॉलीबॉल – मुले – हडपसर, ओझर, मुली – ओझर, हडपसर. खो खो – मुले – पिरंगुट, निमगाव केतकी, मुली – सुपे, वेल्हे, बुद्धिबळ – मुले – करण सुतार (वाघोली), यश आंबेकर (सांगवी), मुली – दिव्या पाटील (आकुर्डी), योगासने – मुले – रूद्र जाधव, रूद्र कांबळे. महाविद्यालयीन गट – 100 मीटर धावणे – मुले – गणेश पवार (आकुर्डी), सनी सुतार (आकुर्डी), मुली – अंकिता इंगुळकर (नसरापूर), सेजल नाईक (आकुर्डी), 200 मीटर धावणे – मुले – हरीष चौधरी (आकुर्डी), शिवम जाधव (सासवड), मुली – प्रिया गुंड (नानगाव), वंशिका बंगाळे (आकुर्डी). 400 मीटर धावणे – मुले – गोपाळ चव्हाण (सासवड), सोमनाथ हावणे (ओतुर), मुली - प्रियंका घुमरे (ओतुर), ज्योती भोईर (ओतुर). 800 मीटर धावणे – मुले – गोपाळ चव्हाण (सासवड), सोमनाथ हावणे (ओतुर), मुली – 1500 मीटर धावणे – मुले – प्रवीण दिघे (ओतुर), आदिनाथ कापरे (ओतुर), मुली – प्रियंका भुमरे (ओतुर), श्रावणी घोलप (ओतुर), लांब ऊ़डी – मुले – मंगेश ढाकणे (सासवड), शंकर बारे (ओतुर), मुली – सपना सावंत (सासवड), आशिया मणेरी (आकुर्डी), गोळा फेक – मुले - सुमित बधे (सासवड), निर्मल गिरी (आकुर्डी), मुली – सेजल नाईक (आकुर्डी), प्रिती गिते (सासवड), थाळी फेक – मुले – आदित्य काकडे (आकुर्डी), समीर जाधव (सासवड), मुली – दामिनी बागुल (आकुर्डी), सृष्टी धापेकर (ओतूर), 4 बाय 100 मीटर रिले – मुले – आकुर्डी, सासवड. मुली – डाळज, आकुर्डी. कबड्डी – आकुर्डी, हडपसर (दोन्हींमध्ये). व्हॉलीबॉल – मुले – हडपसर, आकुर्डी, मुली – आकुर्डी, हडपसर, खो खो – मुले – आकुर्डी, हडपसर (दोन्हींमध्ये) , बुद्धीबळ – मुले - मेघनाथ दरेकर (नसरापूर) , कार्तिकेय महाजन (मांजरी), मुली – सोनाली कोळी (सासवड), सयुरी तोडकर (खराडी), योगासने – मुले – विपूल वळवी, मुली – निशा जमादार, सई जामोदकर.

Post a Comment

0 Comments