म.ए. सो. बाल विकास मंदिर सासवड शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कला सादर करून, उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी पारंपारिक लोकगीते, मोबाईलचे दुष्परिणाम , शेतकरी नृत्य ,पारंपारिक लावणी, लोककला, कॉमेडी, रिमिक्स गाणी, कोळीगीते, गोंधळ गीतांवर नृत्यकला सादर केली. हिंदी- मराठी गाण्यांवर चिमुरड्यांनी केलेल्या नृत्य कलेला रसिकांनी दाद दिली. सुमारे पाच तास चाललेल्या कार्यक्रमास पालक रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांपैकी अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून रक्कम दिली. शुक्रवार ( ता. २६ ) बाल विकास मंदिर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. शाळा समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून. कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला, तसेच शाळेत पालकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी अक्षय मांढरे, मुख्याध्यापक भाऊसो बडधे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी गोविंद लाखे, इंग्लिश मिडियम स्कूलच्या पर्यवेक्षिका सरोज मॅडम, रामदास अभंग, पत्रकार बापू मुळीक, पालक प्रतिनिधी विद्या टकले , शिक्षक प्रतिनिधी शितल चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस वाघोले, संजीवन, बोरकर, माही बडधे , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व परंपरेची जाणीव व्हावी, त्यांच्यातील विविध सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने शाळा दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करत असते. शाळेच्या माध्यमातून सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यास प्राधान्य दिले जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय दिपक कांदळकर यांनी करून दिला. राणी गिरमे यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस वाघोले याने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शार्वी धुमाळ, शिवम जगताप, माही बडधे, कस्तुरी निगडे, स्वाती बोरावके यांनी केले. आभार शीतल चौधरी यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments