वाघिरे महाविद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या स्पर्धा दि सोमवार दि. २९ व मंगळवार ३० डिसेंबर रोजी सासवड येथील वाघीरे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये प्रामुख्याने बुद्धिबळ, योगासने, कुस्ती, कराटे–तायक्वांदो, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारांचा समावेश असून ३,९११ खेळाडू थेट जिल्हास्तरीय फेरीत सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, गटस्तरीय फेऱ्यांमध्ये १५,००० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. सांघिक स्पर्धेत प्रथम आणि वैयक्तिक प्रकारात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणारे खेळाडू जिल्हा स्तरावर पात्र , अशी स्पर्धेची रचना निश्चित करण्यात आली आहे.या स्पर्धांचे उद्घाटन सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८.३० वा. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न होणार आहेत. सदर क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्राताई पवार (खासदार - राज्यसभा, अध्यक्ष बारामती टेक्स्टाईल पार्क, माजी सदस्य, मॅनेजमेंट कौन्सिल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) डॉ. सुरेश गोसावी (कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) डॉ. शैलेंद्र देवळणकर (संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र) डॉ. राजेंद्र विखे पाटील (कुलपती, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) हे उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. पराग काळकर, मा. सतीश राऊत (जिल्हाधिकारी पुणे) या कार्यक्रमास पुरंदर तालुक्यातील आमदार विजय शिवतारे, श्रीमती आनंदीकाकी जगताप (नगराध्यक्ष, सासवड) जयदीप बारभाई (नगराध्यक्ष, जेजुरी) डॉ. पंडित विद्यासागर (माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ) डॉ. दिगंबर दुर्गाडे (अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) डॉ. सुदाम शेळके (क्रीडा संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) डॉ. एम.जी. ताकवले (माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) पै. अमोल बुचडे (महाराष्ट्र केसरी रुस्तम ए. हिंद) मा. अशोक टेकवडे (सी.डी.सी. सदस्य) मा. प्रदीप लांडगे (सी.डी.सी. सदस्य) मा.कल्याण जाधव (अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ) तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडा व कला क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून हा सोहळा ग्रामीण क्रिडा संस्कृतीचा उत्सव असेल. या स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून करण्यात येते, शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि क्रीडा संधींचे त्रिवेणी संगम असलेले व्यासपीठ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव ए.एम. जाधव, प्राचार्य, क्रिडा शिक्षक आणि सर्व शाखाप्रमुखांच्या अथक नियोजन व परिश्रमातून या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments