पुरंदर तालुक्यातील प्रमुख पुढाऱ्यांची असणारी गावच ही पूर्णपणे पिछाडीवर असून ;परंतु एक प्रकारे कोलते व धुमाळ यांना दिलासा ? सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पुरंदर तालुक्यात अनेक अशा राजकीय उलथा-पालथी या स्पष्ट झालेल्या आहेत, काही ठिकाणी तर निकाल सर्वात जास्त धक्कादायक व ही नेत्यांच्या असणाऱ्या स्वतःच्याच गावांमध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याची दिसत असून, तर काही ठिकाणी क्रॉस वोटिंगही झालेले आहेत ,तर मोजक्याच नेत्यांना आपला बालेकिल्ला राखण्यात यश प्राप्त झालेले असून ,माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजप मधील असून, त्यांच्या जवळाजॅन गावातून निरा कोळविहीरे गट आणि कोळविहीरे गणातील भाजपचे उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, गटात जवळा अर्जुन मध्ये राष्ट्रवादीच्या प्राजक्ता दुर्गाडे यांना 7,23 मते तर शिवसेनेच्या भारती मस्के यांना 5,44 मते तर भाजपच्या सीमा धायगुडे यांना केवळ 1,80 मते मिळाली यामधील दुर्गाडे यांनी धायगुडे पेक्षा 5,43 मतांची ही आघाडी घेतलेली असून, कोळविहीरे गणात त्याच गावच्या शिवसेनेच्या उमेदवार शीतल साळुंखे यांनी 7,94 मते घेतली तेथे राष्ट्रवादीच्या स्मिता निगडे यांना 4,82 तर भाजपाच्या सीमा मस्के यांना केवळ 1,61 मते मिळाली येथे जवळा अर्जुनच्या साळुंखे यांनी मस्के यांच्या पेक्षा तब्बल 6,33 मताची आघाडी ही घेतलेली आहे, विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गट विजय शिवतारे यांच्या यादव वाडी गावातून ,वीर भिवडी गटाचे शिवसेनेचे उमेदवार समीर जाधव यांना 2,49 तर भाजपचे उमेदवार हरिभाऊ लोळे यांना 3,21 मते मिळाली असून, यामध्ये लोळे यांनी 72 मतांची आघाडी घेतली याप्रमाणेच या ठिकाणी यादव वाडी बुथवर वीर गणातील शिवसेनेचे उमेदवार प्रवीण जगताप यांना 2,27 तर भाजपच्या सुधीर धुमाळ यांना 3,83 मते मिळाली यामधील भाजपने तब्बल 1,56 मतांची आघाडी घेतली आहे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेश गायकवाड यांच्या भिवडी गावातून काही प्रमाणात अशी स्थिती असून, भिवडी गणातील भाजप शिवसेनेचे उमेदवार याच गावातील असताना, त्यांचा परिणाम या मतामध्येही झाला आहे, वीर भिवडी गटासाठी भिवडीतून भाजपच्या हरिभाऊ लोळे यांना 9,78 तर शिवसेनेच्या समीर जाधव यांना 7,29 मतांची ही आघाडी घेतली आहे. तर लोळे यांनी 2,59 मतांची आघाडी घेतली असून, भिवडी गणात भाजपच्या सायली शिंदे यांनी 1,033 तर शिवसेनेच्या पूजा मोकाशी 7,90 मते घेतली असून, यात शिंदे यांनी 2,43 मतांची आघाडी घेतली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांच्या पांडेश्वर गावात मतांची आकडेवारी दिसून आली आहे की, बेलसर माळशिरस गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार गौरव कोलते हे चक्क पाचव्या क्रमांकावर राहिलेले आहेत, तर येथे भाजपचे अजय इंगळे यांना 4,06 काँग्रेसचे दत्ता झुरंगे यांना 2,14 शिवसेनेचे रमेश इंगळे यांना 1,97 ठाकरे गटाचे शिवसेनेचे अमोल कामठे यांना 1,76 तर राष्ट्रवादीचे गौरव कोलते यांना केवळ 1,58 मते मिळाली आहेत, अशीच परिस्थिती असून ,माळशिरस गावातून गणामध्ये मताचे भाजपचे उमेदवार यांना 4,50 शिवसेनेचे शरद यादव यांना 3,15 तर राष्ट्रवादीच्या अजिंक्य कड यांना 2,44 मते मिळाली असून, राष्ट्रवादी पेक्षा भाजपने 2,06 मतांची आघाडी घेतली आहे, बेलसर माळशिरस गटांमध्ये शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांच्या पिसर्वे गावातून राष्ट्रवादीचे उमेदवार गौरव कोलते यांना 1,476 मते भाजपचे अजय इंगळे यांना 2,45 तर काँग्रेसच्या दत्ता झुरंगेे यांना 1,95 मते या ठिकाणी कोलते यांनी 1,204 मतांची आकडेवारी ही आघाडी घेतली असून, बेलसर गणासाठी झालेल्या पिसर्वे इथून राष्ट्रवादीचे निलेश जगताप यांना 9,55 याच गावातील कुशाल कोलते यांना 7,33 मते तर शिवसेनेच्या माणिक निंबाळकर यांना 3,44 तर भाजपच्या कैलास जगताप यांना केवळ 2,44 मते मिळाले असून, या ठिकाणी पिसरवे गावातील काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा 2,22 मतांची आघाडी घेतली असून, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ यांच्या जेऊर गावातून सुद्धा वीर भिवडी गटाचे पुष्कराज जाधव यांना जेऊर मधून 7,43 मते शिवसेनेचे समीर जाधव यांना 3,89 तर भाजपच्या हरिभाऊ लोळे यांना 3,22 मते मिळाली असल्याचे घड्याळाने येथे 3,54 मताची आघाडी घेतली तर जेऊर मधून वीर गणासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम धुमाळ यांना 8,61 शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना 4,49 तर भाजपच्या सुधीर धुमाळ यांना 2,42 मते मिळाली उत्तम धुमाळ यांनी 4,12 मतांची आघाडी घेतली असून, प्रमुख पुढार्यांची पक्षाच्या स्थितीमध्ये उमेदवारांची मतांची आकडेवारी मध्ये खूप तफावत असून, पुढाऱ्यांच्या या गावांमध्ये अशी स्थिती असेल तर उमेदवारांनी पुढे कसे काम करताना या नेत्यांना विचारात घ्यायचे, हा तर एक प्रश्नच उभा राहिलेला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments