दिवे गराडे गटात व गणात दिव्या जगदाळे, ललिता कटके, देविदास कामथे यांचा प्रचारात आघाडी तर मतदार संघातील गोरगरिबांच्या महत्वाची कामे करणार मतदारांशी संवाद सकारात्मक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दिवे गराडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार दिव्या जगताळे, गराडे पंचायत समिती गणातील उमेदवार ललिता कटके व दिवे पंचायत समिती गणातील देविदास कामथे यांच्या प्रचारार्थ उमेदवारांनी प्रामुख्याने दिवे, जाधववाडी, काळेवाडी, झेडेवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, सिंगापूर, गुरोळी गाव भेठ दौरा आयोजित केला होता, यामध्ये मतदारांनी त्यांना उदंड असा प्रतिसाद उत्तम दिला, जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार, दिव्या जगदाळे, गराडे गणाचे ललिता कटके, दिवे गणाचे देविदास कामथे यांनी मतदारांशी संवाद साधला असता, गटातील व पंचायत समिती गणातील असणाऱ्या विविध समस्या सुविधा यावर भाजपचे उमेदवार सकारात्मक पद्धतीने तोडगा काढून, कुणालाही वंचित ठेवले जाणार नाहीच, सदैव भाजपचे उमेदवार हे शेतकऱ्यांशी संवादात राहूनच, काम करणार असल्याची ग्वाही सुद्धा देण्यात आली, दिव्या जगदाळे यांनी जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत होत असताना कडवी अशी झुंज होत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट या पुढे कडवे आव्हान भाजपने उभे केलेले आहे, त्यामुळे प्रचाराच्या अखेरक्षणी उमेदवारांनी मतदारांशी भेटीगाठी घेत असताना, प्रचारात तरी चांगलीच भाजपने रंगत आणली आहे, तर चांगल्या मताधिक्क्याने जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील उमेदवार भाजपचे निवडून येणार आहेत, त्यामुळे विरोधी गटाची दमछाक केलेली आहे, असेच प्रचाराच्या अखेर तरी स्पष्ट दिसून येत आहे, भाजपचे कमळ म्हणजे घराघरापर्यंत पोहोचवणे हेच आमचे दिवे गराडे गटात व गणात महत्त्वाचे काम आहे ,भाजपच्या विकास कामावरतीच उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे सांगण्यात आले, या कारणामुळे विरोधकांची पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे सैरावैरा विरोधक उमेदवार झालेले आहेत, त्यामुळे भाजपचे कमळ हेच आमचे ब्रीदवाक्य असून, कमळालाच चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावे अशी ही उमेदवार कडून मतदारांशी संवाद सकारात्मक सूचित करण्यात आले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments