Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात पंचमीनिमित्त भाकणूक आणि गजेगोपाळ जेवणावळी घालण्यास सुरुवात सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: देवाचे मानकरी तात्याबा बुरुंगले यांनी भाकणूक (भविष्यवाणी) सांगितली. भाकणूक ऐकण्यासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने भाविक, शेतकरी, मेंढपाळ मंदिर व परिसरात उपस्थित असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने माहिती सांगितली. पहाटे ४ वाजता देवाची पूजा करून, मानकऱ्यांमार्फत देवाला पोशाख करण्यात आला सर्व काट्या पालख्या, मानाचे निशाण छत्री, अब्दागिरी ढोल ताशांच्या लावाजम्यासहित देऊळवाडा गजबजून गेला दुपारी २ वाजता देवाचे मानकरी तात्याबा बुरुंगले यांच्या अंगात संचार येऊन वार्षिक पीक पाणी भाकणूक (भविष्यवाणी) सांगण्यात आली. मृगाचे पाणी तीन खंडात पडेल, चौथ्या खंडात आले आले गेले गेले राहील, आश्लेषा मघा दोन खंडात पडेल, उत्तरा-पूर्वा चार खंडात पडेल, जनतेचे समाधान होईल, हत्तीचे पाणी तीन खंडात पडेल, गाई,गुरे शेळी मेंढी यांचे मागील रोगराई हटलेली आहे, मनुष्याच्या मागे साधारण आटापिटा राहील ,अशाप्रकारे भाकणूक सांगण्यात आली. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट यांचे वतीने सर्व विश्वस्त सल्लागार मंडळ, ग्रामस्थ, सेवेकरी यांच्या नियोजनातून यात्रा उत्सव पार पडत असून मंदिरातील विधी, परंपरा, देवाचा छबिना पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने, प्रशासकीय विभागांशी सुसंवाद देवस्थान ट्रस्टमार्फत कमांडो सुरक्षारक्षक, दर्शन बारी, वाहतूक याकामी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.

Post a Comment

0 Comments