पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावाजवळ सिमेंट गठ्ठूला अडकून दुचाकी स्वराचा मृत्यू सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी पालखी महामार्गाच्या बाह्य वळणावर सोनोरी गावाजवळ रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या सिमेंटच्या गठ्ठूला रविवारी दि. 20 दुचाकी अडकून झालेल्या अपघातात सतीश बबन चव्हाण वय 35 राहणार सुपे खुर्द ता.पुरंदर याचा मृत्यू झाला. याबाबत बाजीराव नामदेव चव्हाण रा. सुपे खुर्द यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सतीश चव्हाण सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटरसायकलने क्रमांक (एम एच 13 एन एन 49 26 )चंदन टेकडी येथे कामावर जात होते. सासवड सोनोरी मार्गावरील पुलाच्या सुरुवातीला रस्त्याचे काम सुरू होते आणि तेथे सिमेंटचा गट्टू व इतर साहित्य ठेवले होते या चव्हाण यांची दुचाकी या साहित्यात अडकून घसरली या अपघातात त्यांच्या डोक्यावरील हेल्मेट निघून पडल्याने, त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर मार लागला, त्यांना तातडीने सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉ.यानी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे, दरम्यान, या अपघातास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा हलगर्जीपणा जबाबदार धरून कारवाई, करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments