Hot Posts

6/recent/ticker-posts

निवृत्त अधिकाऱ्यांच्या पत्नीची जमीन हडपण्याचा प्रयत्न सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधित खानवडी गावात निवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांच्या पत्नीच्या नावा वरील तब्बल चार एकर जमीन बनावट कागदपत्रे आणि व्यक्ती उभी करून, हडपण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शैलेश कोतमिरे यांच्या पत्नी अर्चना शैलेश कोतमिरे (राहणार घोले रोड, शिवाजीनगर पुणे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधार नवनाथ गोरख कापरे, अर्चना कोतमिरे यांच्या नावाचा गैरवापर करणारी बोगस महिला दस्तऐवज तयार करण्यास मदत करणारे विवेक विजय इंगळे, (राहणार वाळुंज तालुका पुरंदर तसेच दस्ता करिता साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलेले विक्रांत पवार (राहणार सासवड) सुरज खेंगरे (राहणार खेंगरेवाडी सासवड) पंकज कुमार( राहणार जगदीशपूर तालुका बागरास जिल्हा बेगूसराई बिहार )आणि लक्ष्मण यादव (राहणार हडपसर पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अर्चना कोतमिरे यांच्या नावे खानवडी येथील गट नंबर 220/1 मध्ये.2017 मध्ये एक एकर आणि सन 2024 मध्ये तीन एकर जमीन राजेश धनराज राठी यांच्याकडून खरेदी केली होती. दरम्यान, शिरीष शहा या नावाच्या एका व्यक्तीने या जमिनीच्या व्यवहाराबाबत कोतमिरे कुटुंबाशी संपर्क साधला, त्यामुळे संशय आल्याने ,कोथमिरे यांनी दस्त नोंदणी कार्यालयात जाऊन, चौकशी केली असता दुय्यम निबंधक पुरंदर कार्यालयात नोंदणीकृत साठे खत व कुलमुखत्यारपत्र तयार करून, त्यावर बोगस सह्या करून, जमिनीची परस्पर विक्री केल्याचे उघड झाले.

Post a Comment

0 Comments