Hot Posts

6/recent/ticker-posts

भिवडी येथे मोफत लॅम्पि लसीकरण शिबिर आणि रोग निवारण औषध वाटप सासवड प्रतिनिधी: भिवडी गावामध्ये डॉ. मनोज शिंदे आणि श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मिलिंद (भाऊ) गायकवाड यांच्या वतीने भिवडी गावातील सर्व जनावरांना मोफत लंपी आजाराची लस टोचून सर्व पशुपालकांना मोफत औषध वाटप आणि रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षस्थानी मिलिंद (भाऊ) गायकवाड हे होते, अध्यक्षांच्या हस्ते गोपूजन करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर कार्यक्रमाला भाजप चे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे व उपाध्यक्ष साकेत जगताप हेही आवर्जून उपस्थित राहिले, त्याचबरोबर नारायणपूर गावचे भरत (नाना ) क्षीरसागर व ज्येष्ठ नेते बापूसो माहुरकर हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिपाली पाईकराव यांनी केले, तर उपस्थितीना लंपी आजाराचे व जनरल मार्गदर्शन डॉक्टर बी. आर. कान्हेरकर यांनी केले. अशाच प्रकारची शिबिर पुरंदर तालुक्यामध्ये वेळोवेळी घेऊ, असे आश्वासन मिलिंद भाऊ यांनी दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही कायमस्वरूपी पूर्ण बरोबर आहोत, खासदार श्रीमंत उदयनराजे महाराज भोसले यांच्या मार्फत आपल्याला लागणारे सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेखर वढणे यांनीही आपल्या तालुक्यातील जनावर संदर्भात किंवा दवाखान्यासंदर्भात लागेल त्या मदत करण्याचे आश्वासन दिले व पुढील काळात शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत उभे राहू असे, आश्वासन दिले .ह्यावेळी मान्यवरांच्या हस्ते पशुपालकांना अत्यावश्यक जनावरांच्या औषधाचे किटचे वाटप करण्यात आले, त्याचबरोबर गावातील सर्व जनावरांना मोफत जंताचे औषध व इतर लागणारे औषधे वाटप करण्यात आले, त्यानंतर आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले डॉ. बापू गायकवाड, डॉ. समीर हिवरकर, डॉ. बाळासो भोर, डॉ. निगडे, डॉ. रविराज ताकवले, पंचायत समितीचे कर्मचारी मयूर व सुरेंद्र गायब्रियल या सर्वांनी पूर्ण गावामध्ये वाडी वस्तीवर जाऊन, लसीकरणासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे आयोजक डॉ. मनोज शिंदे यांनी केले .आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 7 शिबिरे घेतल्याचे त्यांनी सांगितले व इथून पुढच्या काळात मा. आमदार संजय चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हे पशु सेवेचे कार्य असे चालू राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी गावातील मान्यवर व पशु पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यामध्ये आबासो मोकाशी, उपसरपंच विजय भिताडे, साधू भाऊ दिघे, बापू मोकाशी, राहुल मोकाशी, अतुल दादा गायकवाड, अनिल गायकवाड, पांडुरंग अण्णा भिंताडे, माऊली भाऊ दिघे, संभा भाऊ दिघे, भाजप अध्यक्ष बाबुराव जैनक, सदाशिव कदम, चौधरी, विलास खटाटे, अमित शिंदे ,योगेश मोकाशी, संतोष भाऊ भिंताडे, बंडा शेठ पवार, बापू पवार, अण्णा पवार त्याचबरोबर गावातील बरेच मान्यवर उपस्थित होते. डॉ.मनोज शिंदे यांनी मान्यवरांचे पशुपालकांचे व डॉक्टरांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर काळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments