जेजुरी मुख्य देवस्थानच्या विश्वस्त पदी मंगेश घोणे सासवड प्रतिनिधी: जेजुरी ता.पुरंदर येथील खंडोबा गडाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंडदेव संस्थांच्या मुख्य विश्वस्त पदी मंगेश घोणे यांची निवड करण्यात आली आहे, देव संस्थांचे मावळते मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी राजीनामा दिल्याने, देव संस्थांच्या बैठकीमध्ये विश्वस्त पदी घोणे यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी देवकाते होते ,यावेळी विश्वस्त ऍडव्होकेट पांडुरंग थोरवे, पोपटराव खोमणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौदडे, एडवोकेट विश्वास पानसे, व्यवस्थापक आशिष बाठे आधी उपस्थित होते, घोणे हे उच्चशिक्षित असून, पालखी सोहळा, खांदेकरी, मानकरी, मंडळाचे सक्रिय सदस्य आहेत, देव संस्थांचे माजी प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांचे ते बंधू आहेत ,माजी नगराध्यक्ष अमृता घोणे यांचे दीर आहेत, देव संस्थाची सध्या सुरू असलेली उपक्रम वेगाने पूर्ण करणे व येथे येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, यात्रेची नियोजन करणे, आदी कामे प्राधान्याने केली जातील, अशी घोणे यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments