Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणामुळे विद्यालयाची व देशाची प्रगती होऊ शकते : महेश जगताप सासवड प्रतिनिधी: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय माहूर तालुका पुरंदर . जि . पुणे या विद्यालयांमध्ये रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि भावनिक सण आहे .हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा प्रतिक मानला जातो . रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो . याचे औचित्य साधत विद्यालयांमध्ये सैनिकांच्या प्रति कृतज्ञता म्हणून रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी विद्यालयाचा माजी विद्यार्थी महेश बाळासाहेब जगताप आर्मी हवलदार यांना आमंत्रित करण्यात आले होते . त्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार यांनी शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला . याप्रसंगी ओम खोमणे व प्रणाली जगताप या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली . विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार सर यांनी सांगीतला . आपल्या मनोगतामध्ये जवान महेश जगताप यांनी विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये सत्यता तसेच आपण कशातही कमी नाही आपल्या स्वतत्त्वाची ओळख आपणच निर्माण करावी त्याचबरोबर सैनिकी जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले .विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणामुळेच विद्यालयात चा व देशाचा विकास केला आहे . व्यायाम आणि प्रामाणिकपणा आणि खेळ याचे महत्त्व सैनिक दलामध्ये खूप आहे .तसेच या विद्यालयातून मिळालेल्या संस्कारामुळे व खेळाडू वृत्तीमुळे मी आज आर्मी मध्ये भरती होऊ शकलो व भारत मातेची सेवा करू शकलो .मुलांनी आपल्या आई-वडिलांची व देश सेवा करावी . जीवनामध्ये प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाची आहे . तसेच विद्यालयाचा माजी विद्यार्थी या नात्याने आमच्या 2004 -2005 या बॅचमधील मुलांना एकत्र करून शाळेच्या भौतिक विकासात हातभार लावण्याचा निश्चीत प्रयत्न करू असे आपल्या मनोगतातून भावना विद्यालयाप्रति व्यक्त केल्या . या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थीनींनी पुरंदर किल्ल्यावरील सर्व जवानांसाठी राख्या भेट दिल्या असून, रक्षाबंधनाच्या दिवशी या सर्व राख्या जवानां पर्यंत पोहोचतील असे सांगितले .कार्यक्रमासाठी आर्मी मॅन ची कन्या साक्षी जगताप ,इंद्रभान पठारे , रामचंद्र जगताप , विकास राऊत ,लता गायकवाड ,हे शिक्षक तर मंगल जगताप , श्रीकांत खोमणे , रामभाऊ कुंभार ,श्रीकांत गव्हाणे हे शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . कार्यक्रमाचे विद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री महेन्द्र भोसले यांनी सुत्रसंचालन तर आभार पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री रामप्रभू पेटकर यांनी मानले .

Post a Comment

0 Comments