Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवडमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर;तर नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी अशी सवॅसामान्य जनतेची मागणी सासवड प्रतिनिधी: दि. 7 : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. जुन्या झालेल्या या इमारतींमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सासवड नगरपरिषदेच्या तब्बल १०० वर्षे जुन्या सभागृहाच्या इमारतीचाही समावेश आहे. या धोकादायक इमारतीबाबत आवश्यक कार्यवाही करून दुर्घटना टाळण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.जुन्या सभागृहाची इमारतही धोक्याचीसासवड नगरपालिकेच्या जुन्या सभागृहाची इमारत अत्यंत जुनी झाली असून, सध्या ती धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीमध्ये अनेक लहान-सहान व्यावसायिक आपली दुकाने चालवत आहेत. या इमारतीचा काही भाग कोसळण्याच्या परीस्थितीत असून, याबाबत पालिकेने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. प्रशासनाकडून नोटीस, मात्र कारवाई कधी ?सासवड नगरपरिषदेकडून याबाबत संबंधितांना नोटीस दिल्या आहेत. मात्र, केवळ नोटिसा देऊन पुरेसे नाही, तर या इमारती पाडण्याची ठोस कारवाई कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडण्यापूर्वी या इमारती रिकाम्या करून पाडण्याची मागणी जोर धरत आहे." मे महिन्यातच पालिकेच्या जुन्या सभागृहातील सर्व व्यावसायिकांना १९५ ची नोटीस बजावली आहे. याव्यतिरिक्त, शहरात असलेल्या अन्य २८ धोकादायक लहान मोठ्या इमारतींच्या मालकांना आणि रहिवाशांना देखील नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत."डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद. सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदय कुमार जगताप म्हणाले की, पालिकेने जुन्या सभागृहाची इमारत पाडून तिचे नूतनीकरण केल्यास, वरच्या मजल्यावर दुकाने तर खाली वाहन आणि स्वच्छतागृह होऊ शकते, ज्याप्रमाणे पालिकेनेे साळी आळीतील जुन्या वाचनालयाच्या जागी दुकाने सभागृह,काळी शाळेच्या जागेची सृष्टी, कुंजीरवाड्याच्या ठिकाणी स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन उभे केले आहे, त्याप्रमाणे जुन्या सभागृहाचे नूतनीकरण करता येईल, असेही डॉ.उदयकुमार जगताप यांनी ही प्रतिनिधीला माहिती दिली.

Post a Comment

0 Comments