पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी चोरी प्रकरणात कामगाराला नांदेडमध्ये अटक सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील सासवड सोनेरी रस्त्यावरील एका वीट भट्टी मालकाच्या घरातून 60,000 रुपयाची रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी,_ एका कामगाराला अटक करण्यात आली आहे. मधुकर केरबा नामावाड (रा. मरखेल जिल्हा नांदेड) असे अटक केलेल्या कामगारांचे नाव आहे. याबाबत विवेक संजय कुंभार रा. सासवड यांनी मधुकर याला एका व्यक्तीला देण्यासाठी साठ हजार रुपये घरात ठेवण्यास सांगितले आणि ते बाहेर गेले, काही वेळाने परत आल्यावर, त्यांना पैसे चोरीला गेले हे लक्षात आले आणि मधुकर त्यांच्या कुटुंबासह पळून गेल्याचे दिसून आले. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास करताना मधुकर त्याच्या मूळ गावी गेलेची माहिती सासवड पोलिसांना मिळाली. सासवडचे पोलीस पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने, त्यांच्या शेतात पोचले असता, पोलिसांना पाहून त्याने पळ काढला. पोलिसांनी सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून, त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम ही जप्त, सासवड पोलिसांनी केली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments