पुरंदर तालुक्यातील दिवे घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अशी की ब्लास्टिंगमुळे वाहतुकीमध्ये बदल केलेला आहे त्यासाठी पर्यायी मार्ग शोधा सासवड प्रतिनिधी: पुणे करासाठी आणि विशेषत दिवे घाट मार्गे प्रवास करणाऱ्या साठी महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (965 वर आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग हडपसर ते दिवे घाट या पॅकेज सहा अंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने संध्या वेगात सुरू आहे, या कामाच्या पार्श्वभूमीवर दिवे घाट परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा फेरबदल करण्यात आलेला आहे. पालखी मार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवेघाट परिसरातील खडकामध्ये स्पोर्ट ब्लास्टिंग करण्याची गरज आहे, हे ब्लास्टिंग पोलीस प्रशासनाच्या देखरेखी खाली नियोजित पद्धतीने करण्यात येत आहे, त्यामुळे त्या भागातील वाहतूक काही वेळ साठी थांबवावी लागत आहे, पोलीस प्रशासनाच्या परवानगीनुसार ज्या दिवशी खडक फोडण्याचे काम केले जाईल, त्या दिवशी दिवेघाट मार्गावरील वाहतूक सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेमध्ये दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे त्या दिवशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी आवाहन, प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पर्यायी मार्गाबाबत वाहतूक पोलिसांनी पुढील सूचना दिलेल्या आहेत, दिवे घाट मार्ग बंद असताना, वाहन चालकाने कात्रज बोपदेव घाट राज्य मार्ग क्रमांक 131 मार्गे सासवड खेड शिवापुर सासवड लिंक रोड मार्गे सासवड कापूरहोल नारायणपूर राज्य मार्ग क्रमांक 119 मार्गे सासवड आणि हडपसर उरुळी कांचन शिंदवणे घाट राज्य मार्ग क्रमांक 61 मार्गे सासवड या पर्यायी मार्गाचा वापर करावा हे मार्ग दिवे घाट बंद असल्यास, त्या कालावधीमध्ये प्रभावी ठरणार आहेत, प्रकल्प संचालक पुणे यांनी सर्व वाहन चालक आणि प्रवाशांना सुचित केले आहे की, वाहतूक अडथळ्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी नियोजित प्रवासांच्या अगोदर मार्ग तपासूनच बाहेर पडावे, कामाच्या वेळा आणि वाहतूक बंदी बाबत पोलिसांच्या अधिकृत सूचना कडे लक्ष द्यावे, असेही प्रशासनाने सुचित केले आहे, ही सर्व माहिती प्रशासनाच्या वतीने प्रतिनिधीला देण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments