Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे वाहतूक नियंत्रक दिव्याचे उदघाटन सासवड प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी सासवड शहरच्या वतीने सासवड शहरातील वाहतूक समस्या तातडीने सोडवण्यासाठी नगरपरिषदेकडे ३० जुलै २०२५ रोजी निवेदन सादर करून, ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची मागणी केली होती. ही मागणी आज पूर्णत्वास आली असून, सासवड शहरात नव्याने बसवण्यात आलेल्या ट्रॅफिक सिग्नलचे उद्घाटन भाजपा सासवड शहरच्या वतीने नारळ फोडून करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेने तातडीने दखल घेऊन, केलेल्या कार्याचे स्वागत करण्यात आले.उद्घाटन समारंभाला भाजपा सासवड शहराध्यक्ष आनंद( भैय्या )जगताप, मा.सभापती निरा कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुकाका जगताप, मा. उपनगराध्यक्ष अजित जगताप, मा. उपनगराध्यक्ष विजय वढणे, भैरवनाथ ट्रस्टचे मा. अध्यक्ष जयसिंह जगताप, मा. नगरसेवक मोहन जगताप, तुषार जगताप, समीर कामत, मयूर जगताप, राहुल भोंडे, विठ्ठल दिवसे, लोकेश जगताप, अभिषेक जगताप, विवेक लेंडे, कुलदीप कोंडे, अनिरुद्ध दोडके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.सासवड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपा सासवड शहर आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments