Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय; पुरंदरचे भूसंपादन नाही सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील नियोजित असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळाची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत आग्रही आहेत, या विमानतळासाठी राज्य सरकार भूसंपादन करत आहे, ते करताना भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय, हा प्रकल्प होऊ शकत नाही, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. बारामती येथील दौरा उरकून दुपारी मोहोळ यांनी जेजुरी गडावर जाऊन कुलदैवत खंडेरायाची पूजा करून, दर्शन घेतले, असता कुलधर्म कुलाचार संसारतळी भंडाराचा धार्मिक विधी करण्यात आला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते, पुरंदर विमानतळा बाबत स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप व माजी आमदार अशोक टेकवडे हे शेतकऱ्यांबरोबर समन्वय साधत असून, कोणावर अन्याय होऊ देणार नाही, असे मोहोळ म्हणाले. तर सासवड या ठिकाणी आले असता ,पुरंदर विमानतळ प्रकल्प रद्द करण्यासाठी बाधिताचे केंद्रीय हवाई राज्यमंत्र्यांना साकडे, पुरंदर दौऱ्यावर आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना शेतकऱ्यांनी दिले निवेदन 2018 मध्ये, हा या प्रकल्पाला मिळालेली एनओसी रद्द झाल्याचेही, निदर्शनास आणून दिले, आता यावर योग्य तो कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांनी विनंती केली आहे.केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी पुरंदरच्या दौऱ्यावर सासवड या ठिकाणी आले असता, विमानतळ प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन, सादर केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, साकेत जगताप, आनंद जगताप, संतोष जगताप यांच्यासह संघर्ष समितीचे प्रमुख पांडुरंग मेमाणे, कुंभारवळण सरपंच मंजुषा गायकवाड, देविदास कामठे, वनपुरी माजी सरपंच रामदास कुंभारकर, शिवाजी कुंभारकर, सतीश कुंभारकर, महादेव कुंभारकर, सयाजी कुंभारकर, दादासो कुंभारकर, सोपान कुंभारकर, बबन खेडेकर उदाचीवाडी विकास कुंभारकर, तात्या मगर आदी शेतकरी उपस्थित होते. प्रकल्पाच्या स्थानाबाबत प्रश्न शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत, प्रास्तावित विमानतळाच्या 36 किलोमीटर परिगात पश्चिमेस एनडीएचे विमानतळ, उत्तरेला 36 किलोमीटरवर लोहगाव विमानतळ, पूर्वेला 47 किलोमीटरवर बारामती विमानतळ आणि 13 किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक पुरंदर किल्ला आहे ,अशाच ठिकाणी विमानतळ उभारणी कितपत योग्य आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्पामुळे सातही गावातील शेतकऱ्यांचे भवितव्य आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने, भूसंपादनाला त्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांनी आंदोलने, मोर्चे आणि उपोषण केली असून, हा प्रकल्प रद्द करावा किंवा स्थलांतरित करावा अशी मागणी या ठिकाणी पुन्हा केली जात आहे. याठिकाणी शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, प्रास्तावित विमानतळासाठी संपादित होणारी जमीन ही सुपीक व बागायती आहे ,या क्षेत्रामध्ये काही वर्षांपासून तीन पिके घेतली जातात, मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत, तर भूसंपादन व पुनर्वसन कायद्याच्या नुसार बागायती क्षेत्राचे भूसंपादन करण्यास मनाई आहे, तरीही पारगाव, खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहेत, 2018 मध्ये या प्रकल्पाला मिळालेली एनओसी रद्द झाली होती, परंतु 2025 मध्ये पुन्हा त्याच जागेवर प्रकल्प प्रस्तावित झाल्याने, या ठिकाणचे शेतकऱ्यांनी एक प्रकारे चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अन्याय होऊ देणार नाही, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत असल्याचे सांगितले की, मला शेतकऱ्याबद्दल पूर्ण असता आहे, तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, तुमच्या भावना आणि म्हणणे मी केंद्र सरकारपर्यंत, पोहोचवेल आणि यावर समाधानकारक तोडगा काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल अशी हमी सात गावच्या सवॅसामान्य नागरिकांनी दिली.

Post a Comment

0 Comments