भुलेश्वर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने खिचडी वाटप सासवड प्रतिनिधी: महाराष्ट्रातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र भुलेश्वर येथे तिसरा श्रावणी सोमवार रोजी दिवसभरात हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील तरुण भाविकांनी मध्यरात्री बारानंतर मंदिरात येऊन, दर्शन घेण्यास सुरुवात केली. नेहमी प्रमाणे पहाटे शिवलिंगास दही, दूध व पंचामृताने अंघोळ घालण्यात आली. पहाटे पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने, महाआरती करून, मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडापाशी भुलेश्वरास मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंघोळ घालण्यात आली. महाआरती करून पालखी व कावड मिरवणूक काढण्यात आली. दुपारी दोन वाजता मंदिराच्या प्रवेश द्वारावरती मानाच्या कावडींची धार घालण्यात आली. त्यानंतर पालखीची महाआरती करण्यात आली यावेळी भाविक भक्तांना सालाबाद प्रमाणे 500 किलो खिचडी वाटपाचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दौंड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता सकाळी 8.00पासून ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत जवळपास 5500 भाविक भक्तांनी खिचडी चा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजक संजय तात्या थोरात, अतुल आखाडे, आप्पासो शेळके, लक्ष्मण खेनट, नागनाथ मुळीक, उमेश दिवेकर, बाळासाहेब खेनट, राहुल थोरात, महेश थोरात, दिपक शेळके, श्याम कदम ,संकेत थोरात, आदित्य मुळीक, पोलीस मित्र परिवार, भुलेश्वर पुजारी राजेंद्र गुरव आदी दात्याचे सहकार्य लाभले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments