भोरच्या उपविभागीय पोलीस अधिकार पदी राजेंद्रसिंह गौर सासवड प्रतिनिधी: राजगड, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी पदी नुकतीच राजेंद्रसिंह गौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्रसिंह गौर हे चाकण, आळंदी येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदाची उत्तम प्रकारे धुरा सांभाळत होते, त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुस्क्या आवलल्या तसेच शांतता व सलोखा राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले, नुकत्याच झालेल्या आषाढी वारीसाठी आळंदी येथील पालखी बंदोबस्ताच्या नियोजनाचे त्यांनी उत्तम प्रकारे कार्य केले. राजेंद्रसिंह गौर हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून, ते स्पर्धा परीक्षेतून १९९२ साली पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले, त्यांनी सुरुवातीला लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपात महत्वपूर्ण कामगिरी केली, त्यांनी महाराष्ट्रातील परभणी, लातूर, नांदेड लाचलुचपत विभाग, सोलापूर एटीएस, औरंगाबाद तसेच स्थानिक गुन्हे शाखा जालना, क्राइम ब्रांच पिंपरी चिंचवड येथे उत्कृष्ट सेवा बजावली, त्यानंतर त्यांची नियुक्ती उपविभागीय अधिकारी अक्कलकोट येथे झाली.येथे ही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. येथील कार्यकाळ झाल्यानंतर, त्यांची चाकण येथे बदली झाली, तेथे त्यांनी अनेक महत्वपूर्ण गुन्ह्याचा तपास केला, त्यांनी केलेल्या या चांगल्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची भोर या विभागात नियुक्ती झाल्याने त्यांनी भविष्यात कायदा व सुव्यवस्था चांगले राहण्यासाठी व गुन्हेगारीला व खाजगी सावकारीकिला आळा घालून, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे, व महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी, प्रयत्नशील राहणार असल्याचेही, त्यांनी बोलताना सांगितले, तर प्रामुख्याने अवैध धंदे जे पुरंदर तालुक्यात चाललेले आहेत, त्यावर पूर्णपणे अंकुश ठेवणार असल्याचेही त्यांनी आपल्या स्थितीमध्ये पूर्णपणे सांगून टाकले, कारण पुरंदर तालुक्यात अवैध धंदेन्याचा सुलसुळाट भरपूर प्रमाणात झालेला आहे त्याचा मुळापासूनच नायनाट करण्याचे त्यांनी धोरण अवलंबले आहे असे प्रतिनिधीला माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments