राजभवनात रक्षाबंधन हे सिंधुताई सपकाळ यांच्या लेकीचे अनोखे राखीबंधन; तर एक प्रकारे राज्यपालाकडून पितृत्व प्रेम हे लेकीला अनुभवता आले सासवड प्रतिनिधी: पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या अथक, प्रेमळ सुस्थितीतून अनुभवलेल्या आजच्या मुलींनी भरपूर आपल्या जीवनात अडीअडचणी अनुभवता आल्यामुळे, त्या ठिकाणी कधी हार मानली नाही, तेव्हा आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राखी बांधण्यासाठी राजभवनात आल्या व राखी बांधली. तेव्हा राज्यपाल यांनी या निरागस मुलींसाठी शब्द उच्चार करताना म्हणाले की," तुम्ही आता एकट्या नाहीत" तर आज पासून स्वत: तुमच्याबरोबर जडणघडणीत सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे या निरागस मुलींच्या आत्मविश्वास एवढा दृढ झाला की, जीवन जगताना खूप मोठी ताकद, जिद्द निर्माण झाल्याचे आनंदी वातावरणात दिसून आले. कारण याचा प्रत्यय स्वत: राज्यपालांनी सांगितले की, सिंधुताईंची कार्याची व त्यागाची ची सावली या लेकीवर पडली आहे ना, या मुली खूप गुणी, गोड, नम्रतापुवॅक, सहनशीलता, आत्मविश्वासाने उत्तम आहेतच, हा सोहळा तर राखीचा नाहीच, तर आपुलकीचा, माणुसकीचा, प्रेमाचा आहे असे उदगार त्यांनी काढले. राज्यपालांची भेट घेण्यासाठी सिंधुताई सपकाळ यांच्या पुरंदर तालुक्यातील ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळण, मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनी, मुंबई मनपा अंतर्गत विविध महिला बचत गटाच्या सदस्या, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर, जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पेन जिल्हा रायगड येथील विद्यार्थिनी, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड येथील दृष्टीहीन विद्यार्थिनी, प्रतीक्षा महिला बचत गटातील महिलांचा समावेश ,भारत विकास परिषद माटुंगा तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविख्यालयाच्या भगिनींनी सुद्धा राखी बांधल्या. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती, खाजगी सचिव अर्चना गायकवाड, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक गायकवाड, अधिक्षिका स्मिता पानसरे, सुजाता गायकवाड, ममता बालसधनचे जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी, प्रसन्न गायकवाड, माईच्या असणाऱ्या लेकी अनिता, साक्षी, पावणी,जानवी आदी उपस्थित होत्या. यावेळी राज्यपालांनी या सर्वांची नम्रपणे, विचारपूस करून, चौकशी केली व त्यांना भेटवस्तू सुद्धा दिल्या.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments