रेशन कार्ड मोफत ऑनलाइन पद्धतीने येथून पुढे मिळणार तहसिलदार विक्रम राजपूत सासवड प्रतिनिधी: राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रेशन कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून घेण्याचे निर्णय घेतलेला आहे, या सुविधेद्वारे नागरिकांना घरी बसूनच शिधापत्रिका मिळवता येणार आहे. यासाठी मध्यस्थ, एजंट यांची मार्फत होणारी नागरिकांची लूट टाळली जाणार आहे. ऑनलाइन शिधापत्रिका संपूर्ण मोफत आहे, अशी माहिती पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांनी दिली आहे. नागरिकांनी या सुविधेचा वापर करून, मोफत शिधापत्रिका मिळवावे, सध्या तहसिल कार्यालय मार्फत देखील अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. नागरिकांनी मध्यस्थ, एजंट यांच्यामार्फत अर्ज न करता, थेट पुरवठा शाखा येथे अर्ज करावा, असेही आव्हान करण्यात आले आहे. Http//.rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन, रेशन कार्ड साठी अर्ज करता येणार आहे. अर्जदारांना क्लिकवर शिधापत्रिका मोफत मिळवता येणार आहे. पुरवठा शाखा मार्फत जुलै 2025 या महिन्यांमध्ये नागरिकांच्या बाराशे अर्जावर कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. यामध्ये शिधापत्रिका मध्ये नाव समाविष्ट करणे, नवीन शिधापत्रिका आणि अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट इत्यादी कामकाज करण्यात आलेली आहे. शिधापत्रिका विशेष कोणतेही प्रकरण विहित कालावधीपेक्षा प्रलंबित राहणार नाही, यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रलंबित प्रकरणासाठी महिन्याचा पहिला मंगळवार राखीव दिन म्हणून निश्चित केलेला आहे. ग्रामीण विभागात रुपये 44 हजार आणि शहरी विभागातून रुपये 59 हजार रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या कुटुंबांमधून प्राधान्य योजनेची लाभार्थी निवड करण्यात येतात, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत प्रत्येक व्यक्ती प्रति महिना 5 kg अन्नधान्य मोफत वितरण करण्यात येत आहे. जे कुटुंबावरील उत्पन्नाची मर्यादा सांभाळणार नाहीत त्यांनी या योजनेतून स्वत: बाहेर पडावे, असे आवाहन तहसिलदार पुरंदर त्यांच्या वतीने केलेले आहे. त्यासाठीचा अर्ज तहसिल कार्यालय पुरंदर पुरवठा शाखा येथे उपलब्ध आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र लाभार्थी नव्याने, समाविष्ट करता येतील, नागरिकांनी ऑनलाईन इ शिधापत्रिका सुविधेचा वापर करून, शिधापत्रिका मिळवावी शिधापत्रिका पूर्णपणे मोफत असून, एजंट मध्ये यांच्यामार्फत आपली फसवणूक होणार नाही याची सावधगिरी बाळगावी असेही आव्हान तहसिलदार कार्यालय मार्फत करण्यात आलेले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments