पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील घटना सासवड पोलीस ठाण्यामध्ये दोन जनावर गुन्हा दाखल; तर पुरंदरमध्ये जमीन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला अशी शेतकऱ्याची तक्रार सासवड प्रतिनिधी: मांडकीतील शेतकऱ्याची आधार काडॅ लिंक करण्याच्या नावाखाली सहा एकर जमीन लाटण्याचा प्रकार सध्या उघडकीस आला असून, किरण आनंदा भंडलकर( रा. मांडकी ता. पुरंदर) सौरभ दादा शितोळे( रा. साखर कारखान्याजवळ कासारजाई पुणे) यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रूपाली नरेंद्र जाधव( रा. मांडकी ता. पुरंदर )यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. रूपाली जाधव यांच्या तक्रारीनुसार 18 जून 2025 ते 24 जून 2025 या कालावधीमध्ये ही फसवणूक घडलेली आहे. नरेंद्र जाधव आणि त्यांचे बंधू दौलत जाधव यांच्या नावे मांडकी येथे गट क्रमांक 896 मध्ये प्रत्येकी 80 आर एकूण 160 आर आणि गट क्रमांक ३०८/२ मध्ये प्रत्येकी 45 आर एकूण शंभर आर अशी एकूण सहा एकर 10 गुंठे क्षेत्र आहे, दौलत जाधव हे अविवाहित असून, गेल्या चार ते पाच वर्षापासून घर सोडून गेलेले आहेत, नरेंद्र जाधव यांना दारूचे व्यसन असल्याच्या कारणाचा फायदा घेत, गावातील गणेश तात्याबा रांजणे यांनी त्यांची किरण भंडलकर यांच्याशी ओळख करून दिली. यानंतर भंडलकर आणि रांजणे यांनी नरेंद्र यांना जेजुरी येथे दारूपाजून आधार कार्ड लिंक करण्याच्या बाहण्याने जमिनीचे साठेखत आणि कुलमुखत्यार दस्त केले. रूपाली जाधव यांचे मेहुणे शरद दळवी यांनी भंडलकर आणि शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बेकायदेशीर साठी खत आणि कुलमुखत्यार केल्याचे मान्य केले. दस्ता मध्ये नमूद केलेली रोख रक्कम पती यांना दिलेली नाही, दस्ता मध्ये नमूद केलेले कोणतीही चेक माझे पती यांना दिले नाहीत, तसेच माझे दीर दौलत जाधव हे गेले पाच ते सहा वर्ष झाले परागंदा झालेले असताना देखील त्यांच्याही नावे असलेल्या क्षेत्राची बेकायदेशीर साठेखत व कुलमुखत्यार पत्र करून, आरोपी यांनी त्यांचे नावे करून घेतले आहेत. तसेच दस्तावर नमूद केलेली रोख रक्कम माझे पती व मला दिली नसून, दस्तातील नमूद चेक देखील माझे पती अगर मला दिलेले नाहीत आमची फसवणूक झालेली आहे. सासवड शहर व ग्रामीण भागातील पुरंदर मधील बेकायदेशीर रित्या जमीन लाटण्याच्या घटना भरपूर घडत असून, त्यासाठी त्यांची नावे व माहिती सासवड पोलीस स्टेशनला कोणतीही भीती न बाळगता दिली पाहिजेत, दोषीवर त्वरित कडक कारवाई करण्यात येईल असेही सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments