Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील शैक्षणिक सकुलाचे क्रीडा शिक्षक प्रा. निलेश जगताप यांची महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनच्या महासचिव पदी निवड सासवड प्रतिनिधी: सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर शैक्षणिक सकुलाचे क्रीडा शिक्षक प्रा. निलेश जगताप यांची महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनच्या महासचिवपदी नुकतीच एकमताने निवड झाली आहे. नागपूर येथे झालेल्या निवडणुकीत ही निवड झाली, नागपूरचे विजय डांगरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, जवळपास 1990 नंतर प्रथमच पुणे जिल्ह्याला या असोशियन मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, ही पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाचे बाब आहे, निवडीनंतर प्राध्यापक जगताप यांनी हॉलीबॉल खेळाचा विकास करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी काम करण्याची ध्येय असल्याचे सांगितले आहे. त्यांना हॉलीबॉल क्षेत्राचा मोठा अनुभव आहे, त्यांनी यापूर्वी पुणे जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे सहसचिव आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे पुणे जिल्ह्या सह राज्यभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या महासचिव पदासाठी ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावरही प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments