पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत निर्णय जुन्या गाले धारकांना आहे त्याच ठिकाणी जागा मिळणार सासवड प्रतिनिधी: इमारतीच्या जागी नवीन इमारत होण्याचे काम चालू होईल यामध्ये सध्या असलेल्या सर्व गालेधारकांना याच ठिकाणी दुकानासाठी जागा देण्यात येईल, कोणत्याही व्यावसायिकाना विस्थापित होऊ देणार नाही किंवा कोणावर अन्याय होणार नाही, याची हमी, पूर्ण काळजी घेऊ असे आश्वासन माजी आमदार संजय जगताप यांनी या ठिकाणी गाले धारकांना दिले. सासवड ता. पुरंदर येथील जैन मंदिरात नगरपालिकेच्या शंभर वर्ष जुन्या सभागृहाच्या धोकादायक इमारतीमधील व्यावसायिकांचे प्रश्नावर तोडगा करण्यासाठी माजी आमदार जगताप आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये गाले धारकांची बैठक पार पडली. यावेळी जगताप बोलत होते. या बैठकीमध्ये गाले धारकांच्या प्रतिनिधित्व करताना संजय चव्हाण यांनी या धोकादायक इमारतीमधील छोटे-मोठे गाले अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहेत. समाजातील लोक व्यवसाय करून आपले जीवन जगत आहे त्यामुळे या सर्व व्यावसायिकाना विस्थापित न करता, याच जागेवर नवीन इमारत बांधून त्यांना त्याच ठिकाणी दुकाने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी ही चर्चा करण्यात आली आहे, असेही जगताप यांनी सांगितले. जगताप यांचे आश्वासनामुळे गाळेधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होऊन, व्यावसायिकांना सुरक्षित आणि नवीन गाले मिळण्याचे अपेक्षा गालेधारकानी व्यक्त केली आहे. माजी आमदार जगताप व्यावसायिकासाठी चांगला निर्णय घेतील व आम्हाला मान्य असेल असेही संजय चव्हाण यांनी व्यावसायिकानांच्या वतीने स्पष्ट केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments