Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात रक्षाबंधनाच्या पूर्व संधी साधून लाडक्या बहिणींची तुफान गर्दी वाढली आहे; तर सासवडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये राख्या चांगल्या सजून गेले आहेत सासवड प्रतिनिधी: भाऊ बहिणींच्या नात्यातील पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधनाच्या या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील सासवड शहरांमधील मुख्य बाजारपेठेमध्ये रंगीबेरंगी राखीनी बाजारपेठ ह्या चांगल्याच प्रकारच्या स(जून गेलेले आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला व स्टॉलवर हाताने बनवलेल्या राख्या, कार्टून, थीम राक्या चांदीच्या राख्या आणि ट्रेडिंग डिझाईनच्या राख्यांनी ग्राहकांचे एक प्रकारे लक्ष वेधून घेतले आहे. स्थानिक व्यापाऱ्यासोबतच महिला बचत गट स्वय रोजगार करणारी युवक आणि स्थानिक उद्योगांनी यंदा विविध आकर्षक राख्या विक्रीस ठेवून चांगलाच प्रतिसाद मिळवलेला आहे. लहान भावासाठी कार्टून राक्यापासून ते मोठ्या भावासाठी पारंपारिक व धार्मिक राख्या पर्यंत सर्व प्रकारच्या राख्या या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत, मिठाई, पूजेचे साहित्य, भेट वस्तू सांज शृंगार यांच्या असं इतर सणाचे साहित्य खरेदीसाठी ही बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यासाठी सासवड मधील राख्यांचे दुकानदार अमोल राऊत, अर्जुन राऊत, शितल राऊत, रेखा इनामके, पूर्वा मुळीक, शंभूराजे मुळीक ग्राहकांच्या उसळलेल्या प्रतिसादामुळे व्यापारामध्ये चांगले आनंदाचे वातावरण आहे. यंदा विक्रीत वाढ होण्याची जास्त प्रमाणात अपेक्षा व्यक्त केली जात आहे, अशी सविस्तर माहिती अमोल राऊत यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.

Post a Comment

0 Comments