Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात रस्त्याच्या वादामध्ये महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी सासवड पोलिसांमध्ये पाच जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: सासवड येथील गट क्रमांक 73/7 मधील रस्त्यावरून प्रवेश ना करणाऱ्या व खाटीक समाजाच्या महिलेला जातीवाचक, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी, संशयित आरोपी मोहन हरिचंद्र जगताप, किशोर बबन जगताप, प्रल्हाद तुकाराम नागरगोजे, कुणाल प्रल्हाद नागरगोजे, धर्मेंद्र उर्फ काका कुंभारकर या पाच जनाविरुद्ध फिर्याद पूजा कमलाकर घोडके यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. विजय शंकरराव घोडके यांनी सुमारे 25 वर्षांपूर्वी गोरख भगवा विटकर यांच्याकडून गट क्रमांक 73/7 मधील दोन गुंठे जागा खरेदी केली होती, त्यावर त्यांचे कुटुंब विटकर चा नावाच्या परिसरात घर बांधून, राहत असून, तेथे त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे, त्यांच्या जवळील रहिवासी पूजा विजय धोत्रे आणि जयश्री राजेंद्र धोत्रे आहेत या जागेतील रस्ता गेल्या सहा महिन्यापासून वादामध्ये आहे, हा वाद तहसील कार्यालय सासवड येथे असून, 31 जुलै रोजी सकाळी दहा वाजता तहसीलदार विक्रम राजपूत यांनी त्या स्थळ पाहणी केली असता, त्यांनी सांगितले की, कोणालाही कायदेशीर रस्ता अडवता येणार नाही, परंतु तहसीलदार निघून गेल्यावर, मोहन हरिचंद्र जगताप, किशोर बबन जगताप, प्रल्हाद तुकाराम नागरगोजे, कुणाल प्रल्हाद नागरगोजे, धर्मेंद्र उर्फ काका कुंभारकर या पाच जणांनी महिलेच्या विरोधामध्ये शिवीगाळ केली व पूजा विजय धोत्रे व जयश्री राजेंद्र धोत्रे यांनाही रस्त्यावरून जाण्यास मनाई करीत, दमदाटी केली. पीडित कुटुंब भयभीत झाले असून, आरोपीकडून जीवितास धोका असल्याचा, दावा करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments