Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र वीर येथे अमावस्येनिमित्त श्रीनाथांच्या दर्शनाला गर्दी सासवड प्रतिनिधी: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या काशीखंडाच्या काळभैरवाचे अवतार श्रीनाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी, श्रीक्षेत्र वीर देवस्थान येथे श्रावणी अमावस्येनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली. पहाटे ४ वाजता पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. तत्पूर्वीच देऊळवाड्याचा दरवाजा भाविकांसाठी खुला करण्यात आला जेणेकरून पहाटेच्या भाविकांना दर्शन घेता येईल. सकाळपासूनच देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले, सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या, देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी, मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी १२ वाजता धुपारती होऊन मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद करण्यात आला. आजचे महाप्रसादाचे आयोजन नेताजीआबा बबुराव धुमाळ व परिवार यांचेमार्फत करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, लाईट व जनरेटर, दर्शनबारी वाहनतळ व्यवस्था परिसर स्वच्छता, ज्यादा कर्मचारी, स्वयंसेवक ट्रॅफिक पोलीस यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेअरमन राजेंद्र धुमाळ व्हाईस चेअरमन अमोल धुमाळ विश्वस्त सुनील, उत्तमराव धुमाळ, सचिव काशिनाथ हनुमंत धुमाळ, विराज मोहनराव धुमाळ खजिनदार अमोल धों. धुमाळ, बाळासाहेब समगीर, श्रीकांत थिटे, जयवंत सोनवणे प्रमिला देशमुख,अलका जाधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments