शेतकरी राजाला आधार द्या – कर्जमुक्ती व नुकसानभरपाई तात्काळ मिळाली पाहिजे ! सासवड प्रतिनिधी: - महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी राजाचे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देणे अत्यावश्यक आहे.आज राज्यातील शेतकरी दारिद्र्यात आहे. दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. कारण कर्जमुक्तीच्या आशेवर ते जगत आहेत. मात्र निवडणुकीपूर्वी युती सरकारने दिलेले आश्वासन अद्यापही हवेत आहे. जाहीरनाम्यात स्पष्टपणे " कर्जमुक्ती तात्काळ" अशी घोषणा करून सत्ता मिळवली, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळालेला नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता –1️⃣ अतिवृष्टी व पूरग्रस् भागातील तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी.2️⃣ निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करूनमकर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करावी.3️⃣ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस व दीर्घकालीन धोरण तयार करावे.शेतकरी राजाला न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही आजही शेतकरी हेच आपल्या राज्याचे खरे बळ आहे, पण हाच शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पाडला जात आहे, हे दुर्दैवी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभाआहे. शेतकऱ्यांचा आवाज आम्ही थांबू देणार नाही.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments