सामन्यांतील असामान्य आदर्श व्यक्तीमत्व सोमनाथ शिंदे....... सासवड प्रतिनिधी: सासवड मध्ये सकाळी सकाळी बाजारपेठेत सायकल वर स्वार होऊन सर्व देवांचे दर्शन घेणारे व हमखास दररोज भेटणारी व्यक्ति म्हणजे सोमनाथ शिंदे होय.....शिंदे हेअर कटींग सलूनला शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. जुन्या पद्धतीची लाकडी मांडणी असलेले जुन्या काळात घेऊन जाणारे सासवड मधील एकमेव ठिकाण होय. पूर्वी घरी जाऊन सलून सेवा दिली जायची. पण काळानुसार बदल होऊन सलून दुकाने चालू झाली, कै. दिगंबर शिंदे यांनी सलून दुकान चालू केले. ग्रामीण भागातून येणारी जुने ग्राहक अजूनही न चुकता येतात. नारायणपूर येथील कै. नारायण महाराज, गुरू दहिवळ कर महाराज हे दुकानात येत असत. आमदार संभाजी कुंजीर, कै. रामकृष्ण मोरे, कै. शंकरशेठ ऊरसळयांनी देखील वेळोवेळी भेटी दिल्या आहेत.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपायुक्त श्री. युवराज पोमण नियमीत यायचे.आमदार चंदूकाका जगताप हे सुध्दा अधूनमधून भेट द्यायचे.अजूनही अनेक ग्राहक कामधंद्यासाठी बाहेरगावी स्थायिक झाले असले तरी केस कापण्यासाठी महिन्यातून एक रविवारी आवर्जून दुकानात येतात, सोमनाथ सेठ त्यांची सेवा करत असतात. कै.गोविंदसेठ साबळे, राजीव सेठ साबळे हे सुद्धा पुणे येथून दुकानात येत असत. तसेच पुरंदर चे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय दादासाहेब जाधवराव हे सुध्दा दुकानात आवर्जून येतात. जुन्या काळातील ज्येष्ठ नागरिकांची दररोज दुकानात हजेरी असते, वर्तमान पत्र वाचून विविध विषयांवर चर्चा येथे रंगत असते. तसेच दुकानात जुन्या काळातील विविध चित्र आहेत. बरेच कला शाखेतील विद्यार्थी येथे आवर्जून भेट देत असतात. सोमनाथ यांची मुले उच्च शिक्षित असून चिरंजीव अभिजीत शिंदे हे भारती सहकारी बँकेत अधिकारी आहेत.अशा या सासवड कर सोमनाथ शिंदे यांना मानाचा मुजरा परशुराम देशमुख यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments