रोग निवारणाच्या पर्यायी उपचारात्मक पद्धतींचा वापर गरजेचा : डॉ.पंडित शेळके सासवड प्रतिनिधी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय सासवड येथे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी कपिंग थेरपीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी "स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतींसोबतच 'पर्यायी उपचारात्मक पद्धतींचा' वापर समाजाने केला पाहिजे. तसेच ग्रामीण भागात विविध उपचार पद्धती पोहचविणे ही आपली जबाबदारी आहे." असे मत व्यक्त केले. पाठीचे दुखणे, स्नायूंचे व गुडघे दुखी स्नायूंवरील ताण, निद्रानाश, रक्तवाहिन्या फुगुन झालेल्या नसांतील गाठी आदी संबंधित आरोग्य समस्या असलेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात ड्राय कपिंग, वेट कपिंग, मोक्सा कपिंग, फंक्शनल कपिंग, मसाज कपिंग आदी विविध प्रकारांची माहिती देऊन प्रत्यक्ष उपचार करण्यात आले. सदर शिबिरात कपिंग थेरपिस्ट व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.प्रितम ओव्हाळ यांनी सहभागी कर्मचाऱ्यांचे निदान व उपचार केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे कर्मचारी कल्याण विभागाच्या प्रमुख डॉ.सुवर्णा खोडदे व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ.सचिनकुमार शाह, डॉ.उल्हास लंगोटे, डॉ.अण्णासाहेब निंबाळकर, प्रा.प्रशांत शिंदे , प्रा.संदीप व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments