वाघीरे महाविद्यालयाच्या खेळाडूचे राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग मध्ये यश सासवड प्रतिनिधी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, वाघीरे महाविद्यालय, सासवड येथील प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या पृथ्वीराज निलेश शिंदे ह्या पॉवर लिफ्टिंग खेळाडूने 'पॉवर लिफ्टिंग इंडियाने' आयोजित केलेल्या जिजाऊ हॉल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्कॉट प्रकारात २८५ किलोग्रॅम, बेंचप्रेस १५५ किलोग्रॅम व डेडलिफ्ट २८५ किलोग्रॅम वजन उचलून असे एकूण ७२५ किलोग्रॅम वजन उचलून रौप्य पदक पटकावले. सदर खेळाडू प्रशिक्षक रितेश चव्हाण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेळाडूच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांच्या हस्ते ट्रॉफी व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.प्रितम ओव्हाळ, प्रा.सचिनकुमार शाह, डॉ.नितीन लगड, प्रा.वैशाली शेरकर व मच्छिंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments