पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी रामेश्वर मंदिराचे भूमिपूजन सासवड प्रतिनिधी: श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार दि.4 सासवड ता. पुरंदर येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या निमित्त विविध कार्य क्रम, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते या ठिकाणी रामेश्वर शिवलिंग मंदिराची भूमिपूजन करण्यात आले व सिद्धेश्वराची आरती करण्यात आली. श्रावण सोमवार निमित्त रविवार रात्रीपासूनच मंदिरात उत्साहाचे वातावरण होते, रात्री सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाने भक्तिमय वातावरणात भर पडली, सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी रुद्राभिषेक सुरू केला, भाविकांनी रविवारी रात्री 11:00 वाजेपासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत गाभाऱ्यात अभिषेक केले. सकाळी आठ वाजता शिवपिंडीला सजावट करण्यात आली व शृंगार करण्यात आला. श्री साई ग्रुप सुपे, आबा जगताप, मोहन जगताप आणि तेजस कामठे यांच्या वतीने मंदिराची सजावट आणि भाविकासाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या समितीचे प्रमुख संदीप (आप्पा) जगताप यांनी ही माहिती दिली. भूमिपूजन प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, संजय चव्हाण, संजय गणपत जगताप, रमेश जगताप, आनंद जगताप, गणेश सर नाईक, तुषार जगताप, अनिल माने, आबा जगताप आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments