पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न सासवड प्रतिनिधी: आज चार जुलै रोजी राज्य शासनाने जाहीर केलेल्या महसूल सप्ताह निमित्त एक ऑगस्ट 2025 पासून, तालुकास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे मोजे काळेवाडी येथे संपन्न झाले. हा लोकाभिमुख उपक्रम शासनाकडून सुरू करण्यात आला असून, हे अभियान नागरिकांच्या महसूल संबंधित तक्रारी व तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राबवले जात आहे ,काळेवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी पुरंदर श्रीमती वर्षा लांडगे, तहसिलदार.विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी श्रीमती प्रणोती श्रीश्रीमाळ, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, डॉ. विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. अस्मिता सताळकर पशुधन विकास अधिकारी, महसूल नायब तहसीलदार श्रीमती सोनाली वाघ, संजय गांधी नायब तहसीलदार महादेव जाधव, निवडणूक नायब तहसीलदार शुभांगी गोजारी, मंडलाधिकारी सुहास कांबळे, ग्राममहसूल अधिकारी रोहन यादव, गणेश सुतार, हरिश्चंद्र फरांदे, कल्पेश कटारे, बाबा भागवत, दत्तात्रय जगदाळे, सोपान कुटे यांच्यासह बहुसंख्येने अधिकारी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी निगडित प्रश्न निकाली काढून, यात शेतकरी बांधवांसाठी सातबारा उतारा, दुरुस्ती, फेरफार, नोंदी वारस नोंद, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, रहिवाशी दाखले जुने देत असते नोंदवही व पडताळणी मालमत्ता नोंदणी जमिनीचे वर्गीकरण व मोजणी यासह विविध योजनांचे लाभ दाखले नागरिकांनी घेतले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रातिनिधीक स्वरूपात आहेत, लाभारथाना लाभ प्रदान करण्यात आले, यात शासन आपल्या दारी अंतर्गत सोयी, सहाय्यता गट, धनादेश वाटप, वय, राष्ट्रीयत्व अधिवास दाखले, उत्पन्न दाखले, गोल्डन कार्ड, महिलांना बेबी केअर किट, आबा कार्ड, डीबीटी लाभ घोषित आहार किट, संगणक संच, शेततळे, अस्तारीकरण लाभ, कर्जमुक्ती दाखले, स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ, फळपिक विमा, रोटाशवहेटर पेरणी यंत्रणांगणी यंत्र, ट्रॅक्टर वाटप, घरकुल लाभ सिंचन विहीर, लाभ वृक्ष लागवड लखपती दीदी, सनद वाट प्रॉपर्टी कार्ड वाटप याचे वाटप करण्यात आले. आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते खालील प्रमाणे निवडक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला सुषमा संदीप काळे व इतर तहसील कार्यालय पुरंदर संजय गांधी योजना प्रमाणपत्र, लाभार्थी 9, नंदा रमेश झेंडे व इतर तहसील कार्यालय पुरंदर अन्नसुरक्षा शिधापत्रिका योजना लाभार्थी सहा, भरत तुळशीराम झेंडे निलेश रमेश चव्हाण व इतर कृषी विभाग राज्य कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर वितरण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सामुग्राह अनुदान योजना लाभार्थी एक व चार महादेव गंगाराम गायकवाड व इतर पंचायत समिती आरोग्य विभाग आयुष्यमान कार्ड ,लाभार्थी 25किल्ले पुरंदर महिला शेतकरी उत्पादक कंपनी पंचायत समिती एम. एस .आर ,एल, एम कर्ज मंजुरी पत्र लाभार्थी एक मोहन गणपत कांबळे व इतर उपविभागीय अधिकारी पुरंदर जातीचा दाखला लाभार्थी तीन शिवाजी दगडू काळे व इतर तहसील कार्यालय पुरंदर उत्पन्नाचा दाखला लाभार्थी तेरा तशीच दिवसभरात संजय गांधी योजनेसाठी 18, आरोग्य 57, कृषी विभाग 72, पुरवठा विभाग 41, आधार कार्ड तेरा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याते प्रा. सतीश कुमदाळे यांनी केले, तर आभार निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील यांनी मानले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आधी उपस्थित होते
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments