पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी पर्यटन बस चे म्हणजे पी. एम. पी. एम.एल सुरू सासवड प्रतिनिधी: पुणे महानगर परिवहन महामंडळ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पी.एम.पी.एम.एल च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पर्यटन बस सेवेसाठी एक नवीन प्रकारचा टप्पा जोडण्यात आला असून, मार्ग क्रमांक दोन अंतर्गत श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले पुरंदर पायथ्याशी पर्यटन बस सेवेला रविवारी दि. 3 रोजी प्रारंभ करण्यात आला, यावेळी श्री क्षेत्र नारायणपूर देवस्थानचे व्यवस्थापक भरत (नाना) शिरसागर यांच्या हस्ते नारळ फोडून बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्रदीप बोरकर, बाळासो डांगे, रामदास बोरकर, माऊली डांगे, मोहन भरेकर, सोपान जांभळे, दिपक दळवी, प्रविण जगताप, अक्षय डांगे या ठिकाणी आदी मान्यवर उपस्थित होते. या पर्यटनाच्या मार्गामध्ये सासवड येथील सोपान काका मंदिर, संगमेश्वर मंदिर, चांगावटेशवर मंदिर, नारायणपूरचे एकमुखी दत्त मंदिर, नारायणेश्वर मंदिर, किल्ले पुरंदर व कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर यांचा समावेश असून, भक्तगणांना व पर्यटनांना एकाच मार्गातून ही धार्मिक स्थळे अनुभवता येणार असल्याचे, पुणे पर्यटनाचे समन्वयक नितीन गुरव यांनी यावेळी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments