Hot Posts

6/recent/ticker-posts

कलरी पट्टू स्व संरक्षण प्रशिक्षण व हा जीवनशैलीचा भाग बनवा सासवड प्रतिनिधी: एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ होम सायन्स तर्फे कलरी पट्टू स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व सिनेट सदस्य ( एस.एन.डी.टी वुमेन्स युनिव्हर्सिटी )डॉ. सुरेंद्र निरगुडे यांचे प्रतिपादन, प्रशिक्षण कार्यक्रमाची भूमिका सांगताना डॉ. गणेश चव्हाण प्राचार्य, एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे, यांनी या संरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे जीवनातील आव्हाने पेलताना आत्मविश्वासाने आयुष्याची वाटचाल करणे शक्य होणार आहे असे, त्यांनी विषद केले .प्रशिक्षक रविकुमार यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व सांगताना ही कला केरळ येथे उदयास आल्याचे व परशुराम यांनी सुद्धा या कलेत पारंगत्व मिळवल्याचे सांगितले. संरक्षणाप्रमाणेच, प्रति हल्ला करणे शस्त्रसहित व शस्त्र रहित स्वसंरक्षणामध्ये कौशल्यपूर्ण बनता येते .यामुळे शरीर लवचिक, चपळ व सुदृढ बनते हे त्यांनी सांगितले. एस.एन.डी.टी विमेन युनिव्हर्सिटीचे सिनेट सदस्य डॉ. निरगुडे यांनी वकलरीपट्टू स्वसंरक्षण कला ' आत्मसात केल्यानंतर ती कला आपल्या रोजच्या दिनचर्येचा व जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे असे, त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाविद्यालयीन पातळीवर राबवताना अशा स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत अतिशय व्यवहारिकता , उपयोगिता व नाविन्यपूर्णता बाळगल्याबद्दल त्यांनी प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांचे कौतुक केले. विद्यार्थिनींनी अशा प्रशिक्षणाचा वापर फक्त क्रेडिट मिळवणे मार्क्स मिळवणे एवढाच संकुचित न ठेवता अशा प्रशिक्षणातून मिळणाऱ्या तंदुरुस्तीमुळे स्वतःच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक विकासामध्ये व पर्यायाने सर्वांगीण विकासामध्ये हातभार लागणे शक्य होणार आहे असे त्यांनी नमूद केले.

Post a Comment

0 Comments