पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचा अनोखा सायकल बँक उपक्रम; मुलींच्या शिक्षणासाठी नवीन सायकल भेट देण्याचे आवाहन सासवड प्रतिनिधी: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनी साठी सायकल बँक हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरापासून दोन ते तीन किलोमीटरवर शाळा असेल व घरात सायकल नसेल तर पायी प्रवास करावा लागतो, यामुळे शिक्षणात अडथळा येतो, या अडचणीवर मात करण्यासाठी व मुलींना शाळेपर्यंत जाण्यासाठी सायकल बँक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गावातील दानशूर व्यक्ती, पालक, शिक्षक, तरुण मंडळ, समाजसेवक, उद्योगपती, गणपतीमंडळ, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था, संघटना मंडळ यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत 15 ऑगस्ट च्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात सायकल दान कराव्यात व इतर व्यक्तींनी व संस्थांनी 15 ऑगस्ट पर्यंत सायकली दान करण्यासाठी पंकज पाटील 94 04 42 14 27 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पुरंदरच्या गट विकास अधिकारी प्रणोती श्री श्रीमाळ व पुरंदरचे गट शिक्षण अधिकारी वैभव डुबल यांनी केले आहे. सायकल बँक उपक्रमा अंतर्गत जमा होणाऱ्या सायकली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलींना वापरता येतील, नंतर सायकल बँक मध्ये सायकल जमा करून, पुढील वर्षी नव्याने पाचवीत येणाऱ्या मुलींना सदर सायकल उपलब्ध करून दिली जाईल, त्यामुळे मुलींचा शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर होईल, उपस्थिती वाढेल व मुलींचे शिक्षण टिकेल, गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments