नारी परिवार से राष्ट्र तक मूल्य निर्माण धुरी या विषयावर व्याख्यान सासवड प्रतिनिधी : एस.एन.डी.टी पुणे आवार येथे, भारतीय शिक्षण मंडळ या संस्थेचे अखिल भारतीय संघटन मंत्री, बी. आर. शंकरानंदजी यांनी ' नारी: परिवार से राष्ट्र तक मूल्य निर्माण की धुरी 'या विषयावर संभाषण केले. कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष, डॉ. गणेश चव्हाण प्राचार्य एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ होम सायन्स पुणे, व भारतीय शिक्षण मंडळ प्रांत अधिकारी ,यांनी स्त्री शक्ती मातृशक्तीचा आदर करणारी आपली संस्कृती आहे असे प्रतिपादन केले. प्रमुख वक्ता श्री. शंकरानंदजी यांनी,स्त्री आणि पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत आणि ती कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी तितकीच समान आहेत, परस्परावलंबी आणि महत्त्वाची आहेत हे नमूद केले.हा मानवी देह आपल्याला देश सेवेसाठी मिळालेला आहे आणि आपण तो देशसेवेसाठीच पणाला लावला पाहिजे,व आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments