Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांमध्ये मातृभूमीसाठी मातू शक्ती कार्यान्वित करण्यासाठी प्रबोधन पर एस. एन. डी .टी कॉलेज ऑफ होम सायन्स या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन सासवड प्रतिनिधी: एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ होम सायन्स चे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी,विद्यार्थिनींमध्ये मातृभूमीसाठी मातृशक्ती कार्यान्वित करण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून,एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे मध्ये,' मातृभूमी साठी मातृशक्ती ' या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या सिनेट सदस्य, डॉ. अपर्णा लालिंगकर यांनी सुमारे 350 विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, एस.एन.डी.टी वुमेन्स युनिव्हर्सिटीचे सिनेट सदस्य डॉ .महेश कोलतामे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या एन.एस.एस प्रोग्राम ऑफिसर डॉ. ललिता भगत यांनी केले. प्रमुख वक्ता डॉ. अपर्णा लालिंगकर यांनी,भारतीय भूमी ही मातृशक्ती पूजक आहे ह्या बाबत निवेदन केले.अन्नमयकोष , मनोमयकोष , ज्ञानमय कोष विज्ञानमयकोष , आनंदमयकोष अशा पंचकोशातून आपली जडणघडण होत असते. आणि त्यामुळेच आपलं अन्न हे सात्विक असायला हवं. आपल्या कुटुंबाचा आधार ही कायमच मातृशक्ती राहिली आहे. आणि आपल्या देशाला सुद्धा आपण भारत माता असेच संबोधतो.विद्यार्थिनींनी स्वतःला भविष्यामध्ये कुटुंबाचे पालक व मातृशक्तीचे साधन बनण्याइतपत स्वतःला सशक्त बनवणे आवश्यक आहे, तरच सशक्त समाज आणि देशाची निर्मिती होईल,असे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक विकासाला हातभार लावते आणि त्यामुळे ही संस्कृती कायमच व्यक्तिकेंद्रित , स्वार्थी , नकारात्मक संरचनेपासून लांब राहिली आहे आणि म्हणूनच ही संस्कृती त्यागाच्या उदात्ततेवर टिकून राहिली आहे यावर त्यांनी भर दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.महेश कोलतामे यांनी, सर्व अध्यापक वर्ग विद्यार्थिनींना, कन्या मानतात आणि त्याच आदराने विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण व्यवस्था कार्यरत असते असे प्रतिपादन केले. कन्या पूजनाचा संस्कार समाजाने योग्य पद्धतीने अमलात आणला तर, समाजामध्ये आपल्या मुलींना सन्मानाची वागणूक मिळेल असे त्यांनी सांगितले. डॉ. ललिता भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments