पुरंदर तालुक्यातील जन सुरक्षा नाही ही; तर सत्ता सुरक्षा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील शिवतीर्थावर पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जन सुरक्षा विधेयका विरोधात सर्वांनी एकत्रित आंदोलन केले. विधेयकाचा निषेध असो सरकारने हे विधेयक मागे घ्यावी अन्यथा, आम्ही आमचा लढा तीव्र करू, जन सुरक्षा कायदा रद्द करा, जनसुरक्षा नाही ही तर सत्ता सुरक्षा, असा हल्लाबोल विरोधकांनी केला, सरकारच्या दडपशाहीचाा निषेध असो, अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या, या आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाची, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 हे घटना विरोधी व लोकशाही बादक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे, सध्या सरकार हे जन सुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील मूलभूत हक्कावर व हुकुमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी लोकांच्यावर लादले जात आहे. सरकारच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना व तसेच पक्षातील सामान्य कार्यकर्ते याला यातून शिक्षा होणार आहे, तेव्हाही विधेयक आम्हाला मान्य नाही, यावेळी सुदामराव इंगळे, विजय कोलते, हेमंत माहुरकर, अभिजीत जगताप, माणिकराव झेंडे पाटील, दशरथ जगताप, शामकांत भिंताडे, बाळासो भिंताडे, सचिन दुर्गाडे, राजेंद्र बरकडे, राजेंद्र ताकवले, मनोहर जगताप, राहुल गिरमे, विनोद जगताप, श्रीकांत लक्ष्मी शंकर, गौरी कुंजीर, दत्ता चव्हाण, संतोष भोसले, भावसो फडतरे, सुनील धिवार, दत्तात्रय फडतरे, निवृत्ती फडतरे, वामन कामठे ,नारायण भिंताडे, सिराज पानसरे, अंकुश परखंडे, रामदास जगताप, बळवंत गरुड, नितीन साळुंखे, संभाजी पवार, रविंद्र मोरे, शिवाजी कोलते, समर्थ रणवरे आदी उपस्थित होते. यावेळी सासवडचे पोलीस उपनिरीक्षक नारायण खंडागळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गुप्त विभागाचे रुपेश भगत सुद्धा उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments