पुरंदर तालुक्यातील भिवरीत हुक्का पार्लर वर सासवड पोलिसांचा छापा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बेकायदेशीर रित्या हुक्का पार्लर सुरू असलेल्या भिवरी( ता. पुरंदर) येथील मेहफिल हॉटेलवर सासवड पोलिसांनी छापा टाकला, याप्रकरणी हुक्का पिणाऱ्या चार जणांना ताब्यात घेत हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला, कारवाई मंगळवार दि. 9 सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आली, तन्मय कृष्णा झेंडे रा. दिवे तालुका पुरंदर, प्रथमेश महेश बोरकर रा. आंबोडी तालुका पुरंदर, अभय अंकुश कांबळे व प्रवीण संग्राम दवलवाड (दोघे राहणार काळेवाडी तालुका पुरंदर), अशी ताब्यात घेतलेल्या तर चौघांची नावे आहेत, तर हॉटेल मालक युवराज बाळासाहेब रोमन रा. पिंपळे ता. पुरंदर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी तुषार बाळू लोंढे यांनी सासवड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्यादीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवरी येथील मेहफिल हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पालॅर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना मिळाली होती, त्यानुसार पोलीस पथकाने हॉटेल वर छापा टाकला यावेळी दोन टेबलवर चार जण हुक्का पीत असल्याची दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत 4,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सासवड पोलीस स्टेशन करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments